प्रतिष्ठा न्यूज

वसुबारसनिमित्त सुधीरदादांनी केली गोमातेची पूजा ; हरिपूर येथील श्री राधा गोसेवा केंद्रास भेट

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि.२८ : आज वसुबारस. दीपावलीची सुरुवात आज वसुबारसनिमित्त गोमातेची पूजा करून होते. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी आज सकाळी हरिपूर येथील श्री राधा गोसेवा केंद्रास भेट देऊन गाय आणि वासरांचे दर्शन घेतले. त्यांची पूजा केली. त्यांना चारा खाऊ घातला.
आज भल्या सकाळीच सुधीर दादा गाडगीळ हरिपूर येथील श्री राधा गोसेवा केंद्रात गेले. तेथे त्यांचे गोपाळ सारडा आणि रोहित सारडा यांनी स्वागत केले. सुधीरदादांनी गाय आणि वासरू यांची पूजा केली. त्यांना चारा खाऊ घातला. यावेळी अवधूत गवळी, विजय साळुंखे उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!