उद्या रोहित पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ…तालुका अध्यक्ष विश्वास तात्या पाटील
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार रोहित आर आर पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ उदया सकाळी 10 वाजता ढवळी येथील श्री महादेव मंदिरात होणार आहे.या प्रचार शुभारंभास महा विकास आघाडीतील आय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गट यांच्यासह इतर सर्व घटक पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.स्वर्गीय आर आर आबा पाटील यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात याच श्री महादेव मंदिरात केलेली आहे. आबांचा हा राजकीय आणि सामाजिक वारसा रोहित पाटील पुढे चालवत आहेत.तसेच या प्रचार शुभारंभास तासगाव कवठे महांकाळच्या माजी आमदार सुमनताई आर आर आबा पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील,तासगाव तालुका अध्यक्ष विश्वास तात्या पाटील,युवकचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय होवाळे, तासगाव शहर अध्यक्ष गजानन खुजट,युवकचे तासगाव शहर अध्यक्ष अभिजीत पाटील,कवठे महांकाळ तालुका अध्यक्ष संजय पाटील, कवठेमंकाळ शहराध्यक्ष बाळासाहेब पाटील,युवकचे तालुकाध्यक्ष अर्जुन गेंड,महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष विविध सेलचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तरी या प्रचार शुभारंभासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विश्वास पाटील यांनी केले आहे.