प्रतिष्ठा न्यूज

विनापरवाना विदेशी दारुची वाहतुक करणारा इसम जेरबंद १ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; सांगली एलसीबीची कारवाई

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : विनापरवाना विदेशी दारुची वाहतुक करणाऱ्या इसमाला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांना यश आले आहे. त्याच्याकडून १,०७,९७०/-रु चा मुद्देमाल हस्तगत केला.  विनोद विजय पिसे, वय ४४ वर्षे, रा म्हणपुरी मिरज. असे आरोपीचे नाव आहे.
*गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी*
श्री. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली यांनी विधानसभा निवडणूक २०२४ चे आचारसंहितेचे अनुषंगाने अवैध व्यवसायांवर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या. सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण यांनी सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत व स्टाफ यांचे पथक तयार करून अवैध धंद्याची माहिती घेवून त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशित केले होते.
त्या अनुशंगाने दि. १८/१०/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचे पथकामधील पोना अनंत कुडाळकर यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, विनोद पिसे, रा ब्राम्हणपुरी हा त्याचे मोपेड गाडीवरुन विदेशी दारू जादा दराने विक्री करणेकरीता भारतनगर चौकातून कुपवाड कडे घेवून जाणार आहे.

नमूद पथक मिळाले बातमीप्रमाणे, मिरज येथील भारतनगर चौकात चोंच करीत थांबले असता बातमीप्रमाणे एक इसम मोपेड गाडीवरून संशयितरित्या येत असताना दिसला तसा त्याच्चा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास थांबवून त्यास त्याचे नाय विचारले असता त्याने त्याचे नाव विनोद विजय पिसे, वय ४४ वर्षे, रा ब्राम्हणपुरी मिरज असे असलेचे सांगितले. सहा. पोलीस निरीक्षक, नितीन सायंत यांनी त्याचे कब्जत असलेल्या मोपेड गाडीवर पाहिले असता, गाडीचे समोरील भागात एक गोणी व बॉक्समध्ये विदेशी दारू च बिअरच्या बाटल्या मिळून आल्या. त्यास त्याचेकडे दारू बाळगणेचा अगर वाहतुकीचा परवाना आहे का असे विचारले असता त्याने परवाना नसल्याचे सांगितले.

लागलीच सदर विदेशी दारुच्या व बिअरच्या बाटल्या सहा. पोलीस निरीक्षक, नितीन सावंत यांनी पंचासमक्ष जप्त करून म. गांधी चौक पोलीस ठाणेस याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नं. गांधी चौक पोलीस ठाणे करीत आहेत.

*कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार*
मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली. मा. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली. यांचे मार्गर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शरखा, सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत, स्था. गु. अ. शाखा, पोहेकौं / अमोल ऐदाळे, संकेत मगदुम, इम्रान मुल्ला, आमसिद्धा खोत, बाबासाहेब माने पोना / अनंत कुडाळकर, सोमन्त्रय गुंडे, पोशि / सोमनाथ पतंगे

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.