प्रतिष्ठा न्यूज

तासगाव शहरात रोहित पाटलांचा घर टू घर प्रचार…प्रचारात आघाडी…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदार संघातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून विद्यमान आमदार सुमनताई पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांचे तिकीट फायनल झाल्याने ते आजपासून प्रचारात सक्रिय झाले आहेत.सकाळी गणपती मंदिरात दर्शन घेऊन,त्यांनी प्रचारास सुरुवात केली.यावेळी पक्षाचे चिन्ह तुतारी असून ते घराघरात पोहचण्या साठी घर टू घर जाणार असल्याचे रोहित पाटील यांनी सांगितले.यावेळी मोठया संख्येने कार्यकर्ते प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसून आले.अनेक ठिकाणी रोहित पाटील यांचें स्वागत करून त्यांचे औक्षण करण्यात आले.यावेळी तासगाव शहरात रोहित पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.