प्रतिष्ठा न्यूज

विधानसभेच्या सांगली, मिरज आणि खानापूर आटपाडीच्या जागेवर शिवसेना उबाठाचा दावा कायम; पदाधिकाऱ्यांची संजय राऊत यांच्याशी मुंबईत चर्चा

प्रतिष्ठा न्यूज
मुंबई प्रतिनिधी : आज दिनांक 19 10 2024 रोजी शिवसेना नेते खासदार संजय राऊत साहेब यांचे मुंबई येथील मैत्री या निवासस्थानी सांगली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बरोबर बैठक झाली या बैठकीमध्ये जिल्ह्यातील खानापूर आटपाडी, सांगली आणि मिरज या मतदारसंघाच्या बाबतीत शिवसेनेने दावा सोडू नये आणि हे तिन्ही मतदारसंघ शिवसेनेने लढावेत अशी एकमुखाने मागणी करण्यात आली संजय राऊत यांनी यावेळी बोलताना या मतदारसंघाच्या बाबतीत चर्चा चालू आहे लवकरच निर्णय होईल आपण सकारात्मक आहोत असे आश्वासन दिले त्याचबरोबर जिल्ह्यातील मतदार संघाच्या बाबतीत मित्र पक्षांनी अडवणुकीची भूमिका घेतली तर आपण ही वेगळी भूमिका घ्यावी लागेल असे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने संजय राऊत यांच्यासमोर आपापली भूमिका मांडली राउत साहेब यांनी स्वतंत्र प्रत्येक पदाधिकाऱ्यांना वेळ देत असताना मित्र पक्षाकडे आयात झालेल्या उमेदवारांच्या साठी निष्ठावंतांचा बळी देऊ नका भांडवलदारांच्या समोर गेल्या अनेक वर्ष शिवसेनेचा भगवा घेऊन लडणाऱ्या शिवसैनिकांच्या वर अन्याय होऊ देऊ नका अशी मागणी शिवसैनिकांच्याकडून करण्यात आली या शिष्टमंडळात जिल्हाप्रमुख श्री संजय बापू विभुते पैलवान चंद्रहार दादा पाटील शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर उपजिल्हाप्रमुख महादेव मगदूम जिल्हा संघटक बजरंग भाऊ पाटील उपजिल्हाप्रमुख शकील सय्यद उपजिल्हाप्रमुख सुभाष मोहिते , श्री संजय चव्हाण, श्री अनिल पाटील ,कडेगाव तालुका नितीन शिंदे तासगाव शहर प्रमुख विशाल शिंदे तालुकाप्रमुख संजय काटे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजीराव सातपुते सांगली शहर प्रमुख रुपेश मोकाशी तासगाव तालुका प्रमुख प्रदीप दादा माने, कवठेमंकाळ तालुकाप्रमुख मारुती भाऊ पवार दिलीप गिड्डे मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे महादेव हुलवान मिरज विधानसभा उपतालुकाप्रमुख सचिन चौगुले ,शकील भाई पिरजादे , उपविभाग रामचंद्र साळुंखे ,सागर नरोटे ,आनंदराव राजपूत आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.