प्रतिष्ठा न्यूज

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप… मनसेच्या अमोल काळेंचा स्तुत्य उपक्रम…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव तालुक्यातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तासगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुस्तकांचे दालन सुरू करण्यात आले आहे.तासगाव तालुक्यातील एम.पी.एस.सी,पोलीस भरती,सरळ सेवा तसेच स्टाफ सिलेक्शन अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करणाऱ्या मुलांनी पुस्तके मोफत घरी घेऊन जावीत व अभ्यास झाल्यानंतर ती परत करावीत असा उपक्रम आज सुरु करण्यात आला आहे.याचाच एक भाग म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगली जिल्हा संघटक अमोल काळे यांच्याकडून स्पर्धा परीक्षेकरिता लागणाऱ्या पुस्तकांचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले.ज्या विद्यार्थ्यांना पुस्तकांची गरज आहे त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ऑफिसशी संपर्क करण्याचे आवाहन अमोल काळे यांनी
केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.