प्रतिष्ठा न्यूज

सामाजिक कार्यकर्त्या, रेखाताई अवघडे यांची वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली शहर महिला आघाडी अध्यक्षपदी निवड

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : आदरणीय ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्वसामान्य, शासकीय निमशासकीय, कामगार, कर्मचारी,वंचित, शोषित, कष्टकरी, तळागाळातील श्रमिक कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्कासाठी निर्माण केलेली एकमेव कामगार संघटना म्हणजे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन या युनियन मध्ये गोर गरीब कष्टकरी कामगारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी कायम एक पाऊल पुढे टाकून लढा देण्याचे काम करीत असणाऱ्या आणि फुले, शाहू, आंबेडकर चळवळीशी एक निष्ठ असणाऱ्या चिंतामणी नगर येथील सामाजिक कार्यकर्त्या मा. रेखाताई अवघडे यांची, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन मध्ये महाराष्ट्र राज्य सरचिटणीस मा. सुरेश मोहिते व महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते मा.राज अटकोरे यांच्या आदेशानुसार , सांगली शहर महिला आघाडी अध्यक्षा पदी एक मताने निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे साहेब यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी, जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे,जिल्हामहासचिव अनिल मोरे सर, जिल्हा कार्याध्यक्ष जगदिश कांबळे,कोषाध्यक्ष हिरामण भगत, जिल्हा उपाध्यक्ष किशोर आढाव, मनपा क्षेत्र अध्यक्ष युवराज कांबळे, सांगली शहर अध्यक्ष संगाप्पा शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.
मा. रेखाताई अवघडे यांनी आपल्या निवडीनंतर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, मी लहानाची मोठी झोपडपट्टी मध्ये झालेली आहे. बांधकाम कामगार यांचे दुःख आणि कष्ट काय असते ते माझ्या घरातूनच अनुभवले आहे. खरा बांधकाम कामगार हा झोपडपट्टी मध्ये राहिला आहे, त्यांच्या कोणत्याही पाहिजे तसा विकास झालेला नाही. मात्र त्यांच्या हक्काच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ फायदा बोगस नोंदणी करून हे धनदांडगे श्रीमंत, नोकरदार घेत आहेत. या विषयावर आवाज उठवून खरे हकदार असणारे श्रमिक कष्टकरी बांधकाम कामगारांना न्याय देण्यासाठी, आदरणीय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली लढा उभा करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन असे त्यांनी अभिवचन दिले .
त्यांच्या योग्य निवडी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
या प्रसंगी चिंतामणी झोपडपट्टी मधील कष्टकरी बांधकाम कामगार व शहरातील विविध भागातील कष्टकरी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.