प्रतिष्ठा न्यूज

परराज्यातील बॅग लिफ्टींग करणाऱ्या आरोपीस सांगली एलसीबीने आंध्रप्रदेशातून केले अटक

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : परराज्यातील बॅग लिफ्टींग करणाऱ्या आरोपीस आंध्रप्रदेश येथून अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी ही कारवाई केली. सलमान शंकरय्या चल्ला, वय ५२ वर्षे, रा कपरालथिप्पा, बिटरगुंट्टा, ता कवाली, जि नेल्लोर, राज्य आंध्रप्रदेश असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पाच लाख पंचवीस हजार रूपये जप्त करण्यात आले आहेत.
गुन्हयाची थोडक्यात हकीकत-

कवठेमहांकाळ येथील दि. २६/०६/२०२४ रोजी एस. बी. आय. बँकेमधून फिर्यादी हे १० लाख रोख रक्कम काढून वायरचे पिशवीत ठेवून ती पिशवी त्यांचेकडे असलेल्या स्कुटीच्या मध्य हुकाला अडकवून दोन्ही पायाच्या मध्ये येईल अशी अडकवली व ते त्यांचे घरी जात असताना एका अनोळखी इसमाने त्यांना तुमच्या खिशातील पैसे पडले आहेत व ते फिर्यादी गोळा करीत असताना फिर्यादीचे स्कुटीच्या हुकाला अडकवलेल्या वायरच्या पिशवीत असलेले १० लाख रोख रक्कम चोरून नेली. वगैरे गुन्हा नोंद आहे. सदर गुन्हा उघडकिस आणणेबाबत मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सुचना दिल्या.

सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते.
त्या अनुषंगाने दि. ०६/१०/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील पोहेकों / सागर लवटे यांना त्यांचे बातमीदाराकडून माहिती मिळाली की, कवठेमहांकाळ येथील एस. बी. आय. बैंक शाखेच्या बाहेर बॅग लिफ्टींग झालेल्या गुन्हयातील आरोपी हे आंध्र प्रदेश येथील बिटरगुंडा पोलीस ठाणे हद्दीतील आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाली.

नमुद मिळाले बातमीप्रमाणे, सहा. पोलीस निरीक्षक, पंकज पवार यांचे पथक हे आंध्रप्रदेश येथील

बिटरगुंडा पोलीस ठाणे येथे जावून स्थानिक चातमीदार तयार करून सदर चोरीतील आरोपी हा नेल्लोर जिल्हयातील कपरालथिप्पा, बिटरगुंट्टा येथे असल्याची बातमी मिळाल्याने बातमीप्रमाणे सदर ठिकाणी जावून निगराणी करून इसमास पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारतर त्याने त्याचे नाव सलमान शंकरय्या चल्ला, वय ५२ वर्षे, रा कपरालथिप्पा, बिटरगुंट्टा, ता कवाली, जि नेल्लोर, राज्य आंध्रप्रदेश असे असलेचे सांगितले. सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यास दि. २९/०६/२०२४ रोजी कवठेमहांकाळ मध्ये एस. बी. आय. बैंक शाखेच्या बाहेर बॅग लिफ्टींग बाबत विचारणा केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. तसेच सदर गुन्हयातील चोरीस गेलेल्या रकमेपैकी ५,२५,०००/-रु. रोख रक्कम काढून दिली. लागलीच त्याचे कब्जातील रोख रक्कम पुढील तपास कामी सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त केली. सदरचा गुन्हा कोणताही तांत्रिक पुरावा नसताना परराज्यात जावून गोपनीय बातमीदार तयार करून गुन्हा उघडकिस आणला आहे.

सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी कवठेमहांकाळ पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास कवठेमहांकाळ पोलीस ठाणे करीत आहेत.

*कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार*
मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे
मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शानाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोहेकों / सागर लवटे, दऱ्याप्पा बंडगर, सागर टिंगरे, संदिप नलावडे, अमर नरळे, अनिल कोळेकर उदय माळी, सायबर पोलीस ठाणेकडील कॅप्टन गुंडवाडे

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.