प्रतिष्ठा न्यूज

सिद्धेवाडी ता. तासगाव येथील “लोकनेते आर. आर. आबा पाटील एज्युकेशन सोसायटीचे ए. सी. एस.(ऍग्री)” ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्यांनी सामाजिक बांधिलकी जपत वृद्धाश्रमातील निराधार वयोवृद्धांसोबत केला वाढदिवस साजरा

प्रतिष्ठा न्यूज/अनिल शिंदे
सावळज  : सिध्देवाडी ता. तासगाव येथील लोकनेते आर.आर. आबा पाटील एज्युकेशन सोसायटीचे ए. सी. एस. (ऍग्री) ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सौ. मंजुश्री जाधव यांनी अतिरिक्त खर्चाला फाटा देत,आपला वाढदिवस त्यांनी कुटुंबासोबत मोही ता. खानापूर येथील जलहरी शबनक या वृद्धाश्रमामध्ये जाऊन तेथील वयोवृद्धांच्या समवेत साजरा करून तेथील निराधार वृद्ध नागरीकांना औषधे,उपयुक्त साहित्य व खाद्य पदार्थांचे वाटप करत सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी अनोख्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला.
प्राचार्या सौ जाधव या नेहमीच सामाजिक उपक्रमात सक्रिय असतात यावेळी त्यांनी त्यांचा वाढदिवस अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला प्राचार्या सौ. जाधव यांनीही आपल्या आयुष्यात पावलोपावली खडतर परिश्रमातून हे यश संपादन केले असल्याने त्याना निराधारांच्या दुःखाची जाणीव असल्याने तसेच आपण ही समाजाचे काहीतरी देणे लागतो ही सामाजिक बांधिलकी जपत आपला वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करण्याचे ठरविले यासाठी त्यांचे पती नीलकंठ जाधव यांनी त्यांना सर्वोत्तपरी मदत केली.
या कार्यक्रमास जलहरी शबनक वृद्धाश्रमाचे अध्यक्ष राजेश गडकरी,उपाध्यक्ष प्रतिभा गुरव तसेच वृद्धाश्रमातील निराधार वयोवृद्ध उपस्थित होते.
प्राचार्या सौ. मंजुश्री जाधव यांनी सामाजिक बांधिलकी जपत “एक हात मदतीचा”  या उपक्रमाद्वारे अनोख्या पध्दतीने वाढदिवस साजरा केल्याने परिसरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.