प्रतिष्ठा न्यूज

भारताच्या औद्योगिक, सामाजिक विकासात रतन टाटांचे योगदान महत्वाचे : आमदार सुधीरदादा गाडगीळ

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : पद्मविभूषण रतन टाटा यांचे दुःखद निधन झाल्याबद्दल आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या उपस्थितीत रतन टाटा जी यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. यावेळी आमदार सुधीर दादा गाडगीळ म्हणाले की, “रतन टाटा यांचे निधन हे मनाला चटका लावून जाणारे आहे. त्यांची उणीव कायम भासेल. रतन टाटांनी टाटा सन्स चे अध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर टाटा उद्योग समुहाचे चित्र बदलले. फारशा फायद्यात नसलेल्या समुहातील उद्योग बंद केले , तर आधुनिक संगणक शास्त्रात भरीव वाढ करून टाटा कन्सल्टंन्सीला जागतिक स्तरावर पोहचवले. रतन टाटांची कामगिरी हि टाटाला आणि देशाला अभिमानास्पद आहे. ते भारतीय उद्योग क्षेत्रातील ‘टायटन’ होते. आपल्या अर्थव्यवस्था, व्यापार आणि उद्योगातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी रतन टाटा ओळखले जातात. श्री रतन टाटा जी एक यशस्वी उद्योजक तर होतेच त्याबरोबर कायम समाजाचा विचार करणारे, माणुसकी आणि विनम्रतेचे ते मूर्तिमंत होते. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना ”
यावेळी माजी आमदार दिनकर तात्या पाटील, माजी जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य प्रकाश तात्या बिरजे, जिल्हा सरचिटणीस विश्वजीत पाटील, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गीतांजली ढोपे-पाटील , महिला मोर्चा जिल्हा सचिव अरुणा बाबर, माजी नगरसेविका कल्पना कोळेकर , प्रीती काळे, संजय गांधी समिती च्या सदस्य हेमलता मोरे , मंडल अध्यक्ष आनंदा चिकोडे, रवींद्र ढगे , गजानन नलवडे, गौस पठाण, अमर पडळकर , रणजीत सावंत, सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.