प्रतिष्ठा न्यूज
आपला जिल्हा

गगनबावड्यात ‘ कोसळधार ‘ :कुंभी धरण क्षेत्रात 310 मि. मी. उच्चांकी पाऊस: धरण पाणीसाठा 82 टक्क्यावर

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता.8 : गेले चार दिवस गगनबावड्यात धुवाधार पाऊस पडत आहे. ‘चेरापुंजी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गगनबावड्या च्या परंपरेला साजेशी कामगिरी करत आहे.
रविवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासात कुंभी धरण पाणलोट क्षेत्रात अर्थात गगनबावडा सांगशी,सैतवडे,कातळी,लखमापूर, तळीये परिसरात (शासकीय पर्जन्यमापक यंत्राप्रमाणे) 192 मि. मी. तर तालुक्यात आज अखेर सरासरी 2683 मि. मी.पाऊस झाला आहे.
कुंभी धरण क्षेत्रात 310 मि. मी.पाऊस झाला असून आज अखेर धरण क्षेत्रात एकूण 3993 मि. मी. पाऊस झाला. कुंभी धरणात 63.55 द. ल. घ. मी. पाणीसाठा असून संचय क्षमतेच्या 82.66 टक्के भरले आहे.
कालच्या वादळ व पावसामुळे तालुक्यात तीन घरांची अंशतः पडझड झालेली असून अंदाजे 50 हजार चे नुकसान झालेले आहे.
कुंभी धरणातून 300 क्युसेक पाणी विसर्ग कुंभी नदी पात्रात चालू होता.
” आज कुंभी धरणामध्ये 2.25 टीएमसी इतका पाणी साठा झाला असलेने तसेच
धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असलेने कुंभी धरणाची वाढत असलेली पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी धरण परिचालन सूचीनुसार आज केव्हाही वक्रद्वार उघडणेचे नियोजन आहे .वक्रद्वारातून 600 क्युसेक व विद्युतगृहातून 300 क्युसेक असा एकूण 900 क्युसेक इतका विसर्ग नदीपात्रात होणार असून नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ होणार आहे ” त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा अजिंक्य पाटील
शाखाधिकारी,पाटबंधारे विभाग,कळे यांनी दिला आहे.
करूळ घाट वाहतूक चालू नाही.
या अतिवृष्टीचा सर्वात जास्त फटका करूळ घाटाला बसला आहे. काल रात्री पावणे दहाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात खचलेला रस्ता आणि अति पावसामुळे रस्त्यावर आलेली माती यामुळे 12 तास उलटले तरी वाहतूक पूर्ववत करण्यात अपयश आले. दोन जेसीबी सह मदत कार्य युद्धपातळीवर चालू आहे. घाट रस्ता नेमका केव्हा चालू होईल हे सांगणे कठीण आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.