प्रतिष्ठा न्यूज
आपला जिल्हा

जुन्या पेन्शन साठी आ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे: मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा

प्रतिष्ठा न्युज/राजू पवार
नांदेड/ मुंबई दि.10 : शिक्षक आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मुख्यमंत्री ना.शिंदे यांची भेट घेऊन शिक्षक आणि शिक्षकेत्तर सर्व कर्मचारी यांना जूनी पेंशन देण्यात यावी म्हणून साकडे घातले. कर्मचारी यांना जूनी पेंशन लागू करावी म्हणून सकारात्मक चर्चा केली.
1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू व्हावी म्हणून आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे, जुन्या पेन्शनचा प्रश्न तातडीने मार्गी लागावा म्हणून कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या नेतृत्वाखाली सौ संगीता ताई शिंदे ,श्री सुनील भोर, श्री सचिन नलावडे, बाबा पाटील सर, श्री दत्ता पाटील सर अन्य जुनी पेन्शन समन्वयक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेऊन तातडीने बैठक लागावी म्हणून दि.8 मे रोजी सह्याद्री या ठिकाणी थांबून शेवटी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व बैठकीचे आश्वासन घेऊन बाहेर पडले.
माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तातडीने बैठक लावा असे आदेश त्यांच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
येत्या दोन दिवसात कधीही मीटिंग लागू शकते.
2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांसाठी जूनी पेन्शन लागू व्हावी म्हणून आज पहिली सभा सुकाणू समितीची झाली त्याच्यामध्ये सुद्धा अत्यंत सकारात्मक चर्चा झालेली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.