प्रतिष्ठा न्यूज
आपला जिल्हा

नांदेड पंचायत समिती प्रशासन विभागात- छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे कुलदैवत “छत्रपती शिवाजी महाराज” यांची 394 वी जयंती नांदेड पंचायत समिती प्रशासन विभागात मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी- मा.नारवटकर साहेब यांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आले. यावेळी बी.जी.वडजे (विस्तार अधिकारी सांख्यिकी), एस.व्ही.गीते (विस्तार अधिकारी आरोग्य), व्ही.बी. कांबळे (विस्तार अधिकारी पं.स.), मांजरमकर (विस्तार अधिकारी पं.स.), सतीश लकडे (विस्तार अधिकारी कृषी), श्रीमती धांडे (विस्तार अधिकारी कृषी), के.बी.पंदेवाड (सहाय्यक प्रशासन अधिकारी), एम.स.बोर्डे (कनिष्ठ प्रशासन अधिकारी), श्रीमती बोबडे (कनिष्ठ प्रशासन अधिकारी), व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
तसेच यावेळी एन.डी.पुयड पाटील यांच्या वतीने उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांचे भगवी दस्ती, टोपी देऊन सत्कार करण्यात आला व त्यानंतर रुचकर भोजन देण्यात आले.
हा जयंती सोहळ्याचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  एन.डी.पुयड, चेतन पाटील जाधव, अमित उगवे यांनी विशेष परिश्रम घेतले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.