प्रतिष्ठा न्यूज

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य महानिबंध महास्पर्धेचे आयोजन ; पाच लाख प्रथम क्रमांकाचे तर तीन लाख द्वितीय क्रमांकाचे महाबक्षीस

प्रतिष्ठा न्यूज
कोल्हापूर (प्रतिनिधी) : निर्मिती फिल्म क्लब आणि निर्मिती विचारमंच, कोल्हापूर यांच्यावतीने महामानव घरोघरी अभियानांतर्गत आपल्या सर्वांचे आदर्श, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समतावादी आणि मानवतावादी विचारांचा जागर करण्यासाठी मराठी भाषेतील सर्वात मोठ्या भव्य महानिबंध महास्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या निबंध स्पर्धेचा सर्वव्यापी छत्रपती शिवाजी महाराज : जीवन, कार्य आणि विचार असा विषय आहे.
या भव्य महानिबंध महास्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे महाबक्षीस पाच लाख रुपयांचे असून यामध्ये एक लाख रुपये रोख आणि चार लाखांची पुस्तके मिळणार आहेत. द्वितीय क्रमांकाचे भव्य महाबक्षीस तीन लाख रुपयांचे असून यामध्ये पन्नास हजार रुपये रोख आणि अडीच लाखांची पुस्तके मिळणार आहेत. त्याचबरोबर वीस बक्षीसे उत्तेजनार्थ असून प्रत्येकी दहा हजार ज्यामध्ये एक हजार रुपये रोख आणि नऊ हजारांची पुस्तके मिळणार आहेत.
या भव्य महानिबंध महास्पर्धेमध्ये सहभागी प्रत्येकास दोन हजार रुपयांची पुस्तके आणि सहभागाचे प्रमाणपत्रही मिळणार आहे.
या भव्य महानिबंध महास्पर्धेत प्रथम प्रवेश घेणाऱ्या फक्त पाचशे स्पर्धकांनाच प्रवेश दिला जाणार असून प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 30 मार्च, 2024 आहे तर निबंध पाठवण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल, 2024 असून या स्पर्धेचा निकाल 30 मे, 2024 सायंकाळी 6:00 वा. जाहीर केला जाणार असून बक्षीस वितरण 26 जून, 2024 रोजी करण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी नियम व अटी लागू असून निबंध स्पर्धेबद्दल सविस्तर माहिती हवी असल्यास 9420361122 या व्हाट्सअँपच्या नंबरवर निबंध स्पर्धेबद्दल सविस्तर माहिती पाठवा असा मेसेज पाठवावा किंवा निर्मिती फिल्म क्लब, निर्मिती विचारमंच, कोल्हापूर, 873, क/2, सी वॉर्ड,
सिध्दीश्री प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर-416002 या ठिकाणी प्रत्यक्ष भेटावे असे आव्हान आयोजकांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More
Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.