प्रतिष्ठा न्यूज
आपला जिल्हा

नांदेड उत्तर विधानसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा बालेकिल्ला बनवू – नुतन जिल्हाप्रमुख माधव पावडे

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
नांदेड प्रतिनिधी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नुतन जिल्हाप्रमुख मा.माधव पावडे यांच्या हस्ते आज नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील मरळक येथे शिवसेना शाखेच्या नाम फलकाचे अनावरण करण्यात आले.
राज्यात पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवशाही सरकार स्थापन करण्यासाठी जनतेने शिवसेनेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख माधव पावडे यांनी केले.
यावेळी माजी कृषी सभापती शिवसेनेचे जेष्ठ नेते मा.नरहरी पाटील वाघ,माजी तालुकाप्रमुख जयवंतराव कदम, बालाजी कदम, गणेश शिंदे, संतोष पावडे, संजयराव पावडे, अभिजीत भालके, बळवंत तेलंग, काशिनाथ पाटील, अनसाजी कदम, शंकरराव कदम, नामदेव कदम, तातेराव काका, लक्ष्मणराव कदम, नामदेवराव शिंदे, देविदासराव कदम, उत्तम दाळपुसे, लक्ष्मणराव कदम, नागोराव दाळपुसे, बापूराव कदम, रामराव कदम, सुदाम शिंदे, बाजीराव कदम, बालाजी कनकदंडे, बालाजी आव्हाड, तुकाराम कदम, साईनाथ शिंदे, उमाजी पाटील, देवराव काका, बबनराव काळे, ईश्वर शिंदे, किशनराव पाटील, शाखा प्रमुख बालाजी कदम, संतोष कदम, किशन पाटील, राजेश शिंदे, राजेश कदम, गणेश कदम, राजेश कदम, दत्ता शिंदे, विलास शिंदे, रामदास शिंदे, यशवंत शिंदे, वसंत कदम, संतोष कदम, शामराव कदम, गजानन शिंदे, गंगाराम कदम यांच्यासह अनेक उपस्थित होते.
दरम्यान यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख माधवराव पावडे म्हणाले की, नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. आगामी काळातही तो आपल्या शिवसेनेचा बालेकिल्ला असेल मतदारसंघातील शिवसैनिक हे निष्ठावान आणि सच्चे शिवसैनिक असल्यामुळे गद्दारांचे मनसुभे उधळून लावतील असा विश्वास पावडे त्यांनी व्यक्त केला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.