प्रतिष्ठा न्यूज

शोषणमुक्त व स्वावलंबी रिक्षाचालक हे सांगलीचे खरे सामर्थ्य : पृथ्वीराज पाटील

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि.२५ : प्रामाणिकपणे घाम गाळून सांगलीकर प्रवाशांची सेवा करुन उदरनिर्वाह करणाऱ्या रिक्षा चालकांच्यावर रिक्षा परवाना नूतनीकरणासाठी अन्यायी दंड आकारणी शासनाने सुरु केली त्याविरुध्द रस्त्यावर उतरून आपल्या बरोबर आंदोलन करताना शासन दरबारी आवाज उठवला.आपल्यावर ज्या ज्या वेळी अन्याय होईल त्या त्या वेळी मी आपल्या पाठिशी ठाम आहे. आमच्या फौंडेशन व पतसंस्था आणि आपल्या संघटनेच्या माध्यमातून रिक्षा पासिंग व इन्शुरन्स करिता वित्तसहाय्य उपलब्ध करुन दिले. त्यामुळे अनेक रिक्षांचे पासिंग व इन्शुरन्सचे काम झाले याचा मला आनंद आहे. असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले. ते यशोधन सेवा व संपर्क कार्यालय सांगली येथे आयोजित पासिंग व इन्शुरन्स प्रमाणपत्रे वितरण सभेत बोलत होते.

रिक्षा पासिंग व इन्शुरन्स करिता पृथ्वीराज पाटील फौंडेशन, स्व. गुलाबराव पाटील सहकारी पतसंस्था व रिक्षाचालक संघटना यांच्या सहकार्याने वित्तसहाय्य करण्यात आले होते. त्यामुळे पासिंग व इन्शुरन्सचे काम सुलभ झाले. यासाठी पृथ्वीराज पाटील फौंडेशन आणि गुलाबराव पाटील पतसंस्थेचे सहाय्य मोलाचे ठरले. पृथ्वीराजबाबा कायमच आमच्या प्रश्नात लक्ष घालून न्याय मिळवून देतात. त्यांना रिक्षा संघटना मनापासून धन्यवाद देत आहे असे रामभाऊ पाटील म्हणाले.

यावेळी पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते रिक्षा चालकांना योग्यता व वहान विमा प्रमाणपत्रे वितरण करण्यात आले.
यावेळी संघटना अध्यक्ष रामभाऊ पाटील, अजित पाटील, साजिद अत्तार, सलीम कुरणे, रमेश सावंत, साहेब, शकील सय्यद, संजय शिंदे, जमीर पठाण, इम्तियाज मुजावर, सुनील पवार, सुनील कलगुटगी, शंकर अष्टेकर व इतर रिक्षा चालक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.