प्रतिष्ठा न्यूज

तासगावचा दिव्यांग राष्ट्रीय नेमबाज सत्यजितला मंगलमूर्ती सेवाभावी संस्थेचा मदतीचा हात

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव मधील राष्ट्रीय नेमबाज सत्यजित पाटील(दिव्यांग- मूकबधिर) यांना जपानमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी सराव व साहित्यासाठी मंगलमूर्ती सेवाभावी संस्थेकडून आर्थिक मदत देण्यात आली.आर्थिक मदतीचा धनादेश  पत्रकार विठ्ठल चव्हाण,संस्थेचे मार्गदर्शक किरण माने,यांच्या हस्ते देण्यात आला.सत्यजित हा राष्ट्रीय नेमबाज असून त्यांने गोवा येथे झालेल्या इंडिया ओपन कॉम्पिटिशन रायफल पिस्टल स्पर्धेत रौप्य पदक मिळविले असून,आता तो जपान मधील टोकियो येथे होणाऱ्या मूकबधिर ओलंपिक स्पर्धेसाठी प्रयत्न करत आहे.सत्यजितची घरची परिस्थिती बेताची असल्याने पुढील सराव करणे व साहित्य घेणे यासाठी आर्थिक मदतीची गरज लक्षात घेऊन संस्थेच्यावतीने आर्थिक मदत करण्यात आली असल्याचें अध्यक्ष चंद्रशेखर निकम यांनी सांगितले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.