प्रतिष्ठा न्यूज

जिल्हा परिषद शाळा मोबाईलमुक्त करा… दलित महासंघ जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : शिक्षण हे नागरिकांच्या उज्वल भविष्याबरोबर देशाच्या विकासात व प्रगतीत महत्वाची भूमिका बजावते,परंतु याचे गांभीर्य जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना नाही.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिकचे शिक्षक शाळेत अध्यापन काळात मोबाईलवर गेम्स,चॅटिंग करीत आहेत.याचा फटका  विद्यार्थ्यांच्या व शाळेच्या गुणवत्तेला बसत आहे.तेंव्हा जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा मोबाईल मुक्त करा,अशी मागणी दलित महासंघ (मोहिते गट) जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार,खजिनदार राजू सनदी,बंडू केंगार यांनी शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,जिल्हा परिषद शाळामध्ये गोरगरीब,बहुजन समाजाची मुले शिकतात,मुलांचे उज्वल भविष्य घडावे म्हणून शासन कोट्यावधी रुपये शिक्षकांच्या पगारावर खर्ची टाकत आहे.तरी मुलांची सर्वांगीण शैक्षणिक प्रगती व गुणवत्ता दिसत नाही.याचे प्रमुख कारण शिक्षकांच्या हातातील मोबाईल आहे.स्वतःचे ज्ञान किंवा शैक्षणिक अध्यापन कौशले संपादन करण्यापेक्षा शिक्षक मोबाईल मध्ये सतत व्यस्त आहेत.अनेक शिक्षक केवळ पाट्या टाकायचे काम करीत आहेत.परिणामी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.प्राथमिक व माध्यमिक शाळांची गुणवत्ता ढासळत आहे.त्यामुळे पालकांचा जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेवरील विश्वास कमी होऊन विद्यार्थी संख्या झपाट्याने घटून शाळा ओस पडत आहेत.इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर आपल्या अपयशाचे खापर फोडण्यापेक्षा जिल्हा परिषद शाळामधील शिक्षकांनी स्वतःच्या अध्यापनाचा व शाळा गुणवत्ता दर्जा उंचावणे आवश्यक आहे.सरकारने शाळांची गुणवत्ता वाढावी म्हणून शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी केलीत.तेंव्हा शाळेत मोबाईलचा वापर करून शाळा व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला बाधा पोहचविणाऱ्या शिक्षकांच्यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी कारवाई करून सर्व शाळा मोबाईलमुक्त कराव्यात.अशी मागणी निवेदनात जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी केली आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.