प्रतिष्ठा न्यूज

कै. श्रीमती राजमती यशवंत पवार स्मृर्ती खुल्या बुध्दिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
सांगली : विश्वशांती क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, सांगली व के पीएस चेस ॲकॅडमी आयोजि नंतरत दुस-या कै. श्रीमती राजमती यशवंत पवार स्मृती १५ वर्षाखालील खुल्या बुध्दिबळ स्पर्धेला कच्छी भवन, राममंदिर, सांगली येथे सुरूवात झाली.
या स्पर्धेचे उद्घाटन सांगली अर्बन को-आँप बँकेचे चेअरमन मा. गणेश गाडगीळ व प्रतापसिंह राजपूत, सांगलीचे लोकप्रिय आमदार मा. सुधीरदादा गाडगीळ व प्राचार्य रमेश चराटे त्याचबरोबर यांच्याहस्ते पटावरील चाल खेळून व दिप प्रज्वलन करून करण्यात आले. मा. गणेश गाडगीळचा श्री. प्रतापसिंह रजपूत, यांनी तर श्री. प्रतापसिंह रजपूत व निमिष गाला यांचा श्री. विजयकुमार माने यांनी सत्कार केला , प्रा. रमेश चराटेचे उदय पवार व चिंतामणी लिमये यांचे स्वागत विजयकुमार माने यांनी केले. यावेळी आंतरराष्ट्रीय पंच झाल्याबद्दल सातारचा शार्दुल तपासे यांचा तर आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल मा. विठ्ठल मोहिते यांचा सत्कार मा. गणेश गाडगीळ यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी मा. उदय पवार, माजी प्राचार्य मा. रमेश चराटे , कच्छी भवनचे निमिष गाला, सां.मि.कु. महापालिका माजी सभापती संतोष पाटील श्री. चिंतामणी लिमये पी.व्ही.पी.आय.टी गर्हेनिंग काँन्सिल हेड मा. प्रतापसिंह रजपूत, उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक संयोजक व प्रशिक्षक श्री. विजयकुमार माने यांनी केले. आपल्या उदघाटनपर भाषणात आमदार मा. गणेशराव गाडगीळ यांनी सांगलीची बुध्दिबळ परंपरा सांगून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.तसेच सुधीरदादा गाडगीळ यांनी सांगलीची बुध्दिबळ स्पर्धा भरविण्याची ऐतिहासिक परंपरा सांगितल्या व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी मा. सुधीरदादा गाडगीळ यांचा उपप्राचार्य रमेश चराटे यांच्याहस्ते स्वागत करण्यात आले. माजी सभापती संतोष पाटील यांचा क्रीडा क्षेत्रातील कार्याबद्दल कुशल संघटक म्हणून मा. सुधीरदादा गाडगीळ यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. आभार केपीएस चेस ॲकॅडमीचे प्रशिक्षक मा. विजयकुमार माने यांनी मानले.
या स्पर्धेला सांगली, कोल्हापूर, सातारा आदि जिल्हयांतील 384 खेळाडू सहभागी झाले आहेत. यामध्ये आदित्य चव्हाण, वरद पाटील,व्यंकटेश खाडेपाटील, ईश्वरी जगदाळे, ईशान कुलकर्णी , अभय भोसले, शौर्य बागडीया, मृण्मयी गोसावी, हर्ष धनवडे , सिध्दी कर्वे , अथर्व तावरे, अरीना मोदी, अर्णव पोर्लेकर,साजिरी देशमुख, मंथन शहा, तन्मयी घाटे , साळवे स्वरूप,अरीन कुलकर्णी, आशिष मोटे , पियुष माने यांच्यासह 34 आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूंचा समावेश आहे.
पाचव्या फेरीत सांगलीच्या आदित्य चव्हाणने कोल्हापूरच्या अरीना मोदीचा,मिरजेच्या वरद पाटीलने कोल्हापूरच्या अर्णव पोर्लेकरचा, सातारच्या तन्मयी घाटेने कोल्हापूरच्या व्यकंटेश खाडेपाटीलचा, सांगलीच्या ईश्वरी जगदाळेने सांगलीच्या अरीन कुलकर्णीचा, सांगलीच्या ईशान कुलकर्णीने सांगलीच्या पियुष मानेचा, नांदणीच्या अभय भोसलेने कोल्हापूरच्या स्वरूप साळवेचा , इचलकरंजीच्या शौर्य बागडीयाने सांगलीच्या ऋचित मुकेचा , इचलकरंजीच्या अथर्व तावरेने प्रणव मोरेचा, सांगलीच्या मंथन शहाने जिवनेश सामाणीचा,कृष्णा सारडाने सांगलीच्या आशिष मोटेचा पराभव केला व आपली आघाडी कायम केली. क्षितीज कोळीने सिध्दी कर्वेला बरोबरीत रोखून अर्ध्या गुणासह आघाडी घेतली.
पाचव्या फेरीअखेर गुण – आदित्य चव्हाण, वरद पाटील, तन्मयी घाटे, ईशअवरी जगदाळे,ईशान कुलकर्णी , अभय भोसले, अथर्व तावरे 5 गुणासह संयुक्त प्रथम स्थानावर तर क्षितीज कोळी, सिध्दी कर्वे, मंथन शहा, कृष्णा सारडा, वेदांन्त बांगड,सौमित्र केळकर, अर्णव रहाटवळ , अर्णव भस्मे यांनी 4.5 गुणासह संयुक्त दुस-या स्थानावर , अरीना मोगी, अर्णव पोर्लेकर,व्यंकटेश खाडेपाटील,अरीना कुलकर्णी ,पियुष माने ,स्वरूप साळवे, ऋचीत मुके, प्रणव मोरे यांच्यासह 39 खेळाडू 4 गुणासह संयुक्त तिस-या स्थानावर आहेत.
पाचव्या फेरीअखेर गुण – 1) आदित्य चव्हाण – 5, 2) वरद पाटील-5, 3) तन्मयी घाटे-5,
4) ईश्वरी जगदाळे -5 , 5) ईशान कुलकर्णी -5 , 6) अभय भोसले -5 , 7) अथर्व तावरे – 5
या स्पर्धेचे पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच सौ. पौर्णिमा उपळावीकर- माने, आंतरराष्ट्रीय पंच शार्दुल तपासे ( सातारा ) सौ. अमिता मोदी( कोल्हापूर ),करण परीट ( इचलकरंजी ), मोहिनीराज डांगे ( हातकणंगले),सदानंद चोथे , नाझिया पटेल , सागर कदम,शाहरूख कुरणे .दिपक वायचळ ( सांगली), हे काम पहात आहेत. या स्पर्धेचे संयोजन मा. उदय पवार विश्वशांती क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व केपीएस चेस अँकँडमी यांनी केले आहे.

फोटो ओळी – 2 री कै. श्रीमती राजमती यशवंत पवार स्मृती 15 वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धेचे पटावरील चाल खेळून उद्घाटन करताना मा. गणेश गाडगीळ व प्रतापसिंह राजपूत सोबत – निमिष गाला, उदय पवार, विजयकुमार माने,चिंतामणी लिमये,प्रा. रमेश चराटे, पौर्णिमा उपळावीकर, संतोष पाटील, विठ्ठल मोहिते

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.