प्रतिष्ठा न्यूज

अनिता प्रविण कळसकर यांना राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार

प्रतिष्ठा न्यूज
कल्याण : सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा या क्षेत्रातील कामाची दखल घेऊन कल्याणच्या समाजभूषण प्राप्तकवियित्री मा.अनिता प्रविण कळसकर यांना नुकताच आदर्श रायगड वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी कडून राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्काराने अंबरनाथ येथे तृतीय वर्धापनदिनानिमित्त सन्मानित करण्यात आले . शिक्षणक्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या (एम.ए.एम.फिल )असणा-या अनिता प्रविण कळसकर यांच्या साहित्यिक क्षेत्राततील भरीव कामगिरी बद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.अनिताताईंनी दोन राज्यस्तरीय काव्य संमेलनाचे आयोजन कल्याण येथे केलेले होते.त्यावेळी महाराष्ट्रातील अनेक नामवंत कलाकारांनी या संमेलनात आपली हजेरी लावली.तसेच आस्वाद ही घेतला ‌.अनिता कळसकर या शब्दसुमने साहित्यिक मंच च्या संस्थापिका आणि अध्यक्षा आहेत.नुकताच त्यांना प्रजासत्ताक अमृत गौरव, महाराष्ट्र राज्य या समितीने समाजभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.त्यात २९सप्टेंबर २०२४ला राज्यस्तरीय साहित्यरत्न या पुरस्काराने गौरविण्यात आले .
अंबरनाथ येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.याप्रसंगी शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, मुख्य संपादक शैलेश सणस, उपसंपादक अविनाश म्हात्रे,मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, नगरसेवक सचिन पाटील तसेच प्रेरणा फाऊंडेशन च्या अध्यक्षा सौ.दिप्ती गावकर कुलकर्णी इ.मान्यवर उपस्थित होते.अनिता प्रविण कळसकर यांना राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्यिक क्षेत्रात त्यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव होत आहे.ए

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.