प्रतिष्ठा न्यूज

स्काऊट्स अँड गाईड्स जिल्हाध्यक्षपदी डॉ. सोनाली बनसोडे

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य हिंदुस्तान स्काऊट अँड गाईड्स सांगली जिल्हा अध्यक्षपदी डॉ. सोनाली बनसोडे यांची निवड करण्यात आली. कोकण विभागचे डिव्हिजनल ऑफिसर मोसीन पाथरवट यांच्या हस्ते नियुक्तीचेपत्र विजयनगर येथील कार्यालयात देण्यात आले. स्काऊट्स अँड गाईडच्या माध्यमातून वरिष्ठ पदाधिकारी नरसिंग मेघजी, गोपाळराव डोंगरे, डॉ. प्रवीण चित्ते व शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार विद्यार्थी विद्यार्थिनींचे शैक्षणिक गुणात्मक दर्जा व व्यक्तिमत्व विकास करण्याच्या दृष्टीने योग्य दिशादर्शक म्हणून, कर्तव्य भावनेने जबाबदारी पार पाडण्यात येईल असे सत्कार प्रसंगी डॉ. बनसोडे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी जयदीप कदम, गाईड कॅप्टन रुतिका गुरव, अझर मुलानी, गुंडू कांबळे पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. बनसोडे यांच्या निवडीने सर्वत्र कौतुक होत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.