प्रतिष्ठा न्यूज

निरक्षरांचे सर्वेक्षण व इतर अशैक्षणिक काम करण्यास शिक्षक सेनेचा बहिष्कार : राज्याध्यक्ष ज. मो. अभ्यंकर

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
नांदेड : महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत सर्वेक्षण व अशैक्षणिक कामावर बहिष्कार टाकला आहे.
शिक्षकांना निरक्षरांचे सर्वेक्षण करण्याचे शासनाने आदेश काढले आहेत. तसेच निरक्षरांचे सर्वेक्षण व इतर अशैक्षणिक काम निवडणूक पुर्व काम BLO कामे हे शालेय कामकाज सोडून सुट्टीच्या वेळेत तथा सुट्टीच्या दिवशी करवायास सांगितले आहे, हे सर्व अशैक्षणिक कामे शिक्षका मार्फत करुन घेतले जात आहेत. सर्वेक्षण तसेच निवडणूक पूर्व कामे या संदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना प्रांताध्यक्ष- मा. ज.मो.अभ्यंकर यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेने तर्फे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे मंत्री- ना. दिपकजी केसरकर, प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग मंत्रालय- मा. रणजितसिंह देओल, व शिक्षण आयुक्त पुणे- मा. सूरज मांढरे, यांना दि. 21आँगस्ट 2023 रोजी पत्र लिहीले आहे. या पत्रात मा.अभ्यंकर यांनी राज्यातील शिक्षकांना अशैक्षणिक कामे व निरक्षरांचे सर्वेक्षण करण्याची कामे देऊ नयेत ही कामे शिक्षक करणार नाहीत असे नमूद केले असून या अशैक्षणिक निरक्षरांचे सर्वेक्षण कामावर महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना बहिष्कार टाकत आहे असेही नमूद करण्यात आले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.