प्रतिष्ठा न्यूज

खाडे पब्लिक स्कूलमध्ये वाजणार पाणी पिण्याची बेल- कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे 
मिरज: दास बहु उद्देशीय विश्वस्त संस्था संचलित मातोश्री तानुबाई दगडु खाडे पब्लिक स्कूल मालगाव येथे मुलांच्या सर्वांगीण विकासावर वभर दिला जातो. मुलांच्या बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकास व्हावा या उद्देशाने एक नाविन्यपूर्ण उपक्रम चालू केला आहे.
मानवी शरीरामध्ये पाण्याचे विशेष महत्त्व आहे. दिवसभरात आपल्याला साधारण दोन ते अडीच लिटर पाण्याची आवश्यकता असते. पण आपण याकडे विशेष  लक्ष देत नाही. त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण दिले जाते. अशीच काही परिस्थिती आपल्या मुलांची आहे. मुले ही शाळेत साधारण सहा तास असतात या वेळेत त्यांनी साधारण एक ते दीड लिटर पाणी पिणे अपेक्षित असते. पण हे मुलांकडून होत नाही. याची कारणे अनेक आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम कंटाळा, पाणी पिण्याने लघवीला येईल ही भीती असते. या समस्येसाठी खाडे स्कूलमध्ये एक नाविण्यपूर्ण उपक्रम राबवला आहे . तो म्हणजे स्कूलमध्ये वाजणार वॉटर बेल. स्कूलमध्ये वाजणार मुलांना पाणी पिण्याच्या आठवणीसाठी वॉटर बेल. याविषयी अधिक माहिती सांगताना संस्थेच्या कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे यांनी असे सांगितले की, अनेक पालकांकडून मुले पाणी पीत नाहीत त्यामुळे त्याचा परिणाम वारंवार आजारी पडत आहेत. आम्ही सांगून थकलो आहे. शाळा पातळीवर आपण काहीतरी करा. यावर आम्ही सर्व शिक्षकांशी चर्चा केली. यातून ही संकल्पना सुचली.
      यासाठी संस्था अध्यक्ष तथा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे, संचालिका सुमनताई खाडे, सुशांत खाडे यांच्याकडून तात्काळ परवानगी काढली व वॉटर बेल चालू केली. ही बेल तासिका बेल व जेवणाची बेल सोडून इतर वेळेला दोनदा वाजवली जाते. मुलेही आवडीने या बेलची वाट पाहतात व पाणी पितात. या आमच्या वॉटर बेलमुळे मुलाच्या आरोग्यासाठी होणार आहेत अनेक फायदे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.