प्रतिष्ठा न्यूज

जागतिक भविष्यवेधी शिक्षणासाठी शिक्षकांनी मुलांना स्वत: शिकण्यास प्रेरणा द्यावे : आशा घुले; निपूण भारत प्रशिक्षणास प्रारंभ

प्रतिष्ठा न्यूज/राजू पवार
नांदेड : सध्या जग झपाट्याने बदलत आहे, शिक्षणामध्ये अमुलाग्र बदल होत आहेत. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी भविष्यवेधी शिक्षण घ्यायचे असेल तर मुलांची अध्ययन कौशल्य विकसित व्हायला हवीत असे प्रतिपादन श्रीमती आशा घुले यांनी केले .त्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,नांदेड येथे निपूण भारत प्रशिक्षणात मार्गदर्शन करतांना बोलत होत्या. त्या बोलताना म्हणाल्या की, मुलांच्या शंभर टक्के क्षमतांचा उपयोग केला पाहिजे शिक्षकांनी आता यापुढे शिकवायचे नाही तर त्यांनी मूल कसे शिकेल आणि त्याला कोणकोणती कौशल्ये अवगत होतील यासाठी मार्गदर्शन करायला हवे असे त्यांनी सांगितले. जागतिक दर्जाचे शिक्षण देणारी शाळा निर्माण झाली पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करून त्यांचा सन्मान करावा असे आव्हान त्यांनी केले .
यावेळी श्रीमती सारिका कुलकर्णी मॅडम यांनीही प्रशिक्षणार्थी शिक्षकांना मार्गदर्शन केले.
या ठिकाणी निपूण भारत ,नवीन शैक्षणिक धोरण प्रशिक्षण घेण्यासाठी दोन गट करण्यात आले असून यात 135 प्रशिक्षणार्थी शिक्षक उपस्थित आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.