प्रतिष्ठा न्यूज

आझादी का अमृतमहोत्सवा निमित्त पोस्ट ऑफिस च्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड दि.14 : शहरातील अशोकनगर ( वसंतनगर) भागातील महिला पोस्ट ऑफिसच्या वतीने आजादी का अमृतमहोत्सवानिमित्त चित्रकला परिक्षेचे आयोजन दि.13 आगस्ट रोजी करण्यात आले होते. या परीक्षेत राजर्षी शाहू विद्यालयातील 51 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
देशाच्या 75 व्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आणि हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा, कलेची आवड निर्माण व्हावी यासाठी पोस्ट ऑफिस, नांदेड चे अधिक्षक श्री पाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला परीक्षेचे आयोजन करण्यात आले. या परीक्षेस राजर्षी शाहू विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.
यावेळी विद्यार्थ्यांनी थोर राष्ट्रपुरूष, नैसर्गिक चित्र, आझादी का अमृतमहोत्सवानिमित्त जनजागृती या विषयावर सुरेख चित्रे काढली.
परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी महिला पोस्ट ऑफिसच्या वतीने एस पी. एम.श्रीमती झेंडे , श्रीमती वर्षा जाधव ( पी. ए), कु. मोहिनी चव्हाण या कर्मचा- यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी प्राचार्य श्री बालाजी हंगरगे, उपप्राचार्य डॉ. पांडुरंग यमलवाड पर्यवेक्षक पंजाबराव सावंत, कला शिक्षक राजेश मोरे, यांचे मार्गदर्शन लाभले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.