प्रतिष्ठा न्यूज

तासगावात ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त शहीद स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राष्ट्रसेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने तासगाव मधील स्वातंत्र्य सैनिक शहीद स्मारकाला अभिवादन करण्यात आले.यावेळी ज्येष्ठ विचारवंत प्रा डॉ बाबुराव गुरव उपस्थित होते,त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील तासगाव मधील क्रांतिकारकांचे योगदान ऐतिहासिक वारसा लाभलेले आहे तो वारसा जतन करणे आणि नविन पिढीला माहिती करून देण्यासाठी प्रयत्नशील राहीले पाहिजे असे मत व्यक्त केले.तासगावचे स्वातंत्र्य सैनिक आमदार गणपतराव कोळी यांचे चिरंजीव अशोकराव कोळी यांनी शहीद स्तंभाला अभिवादन केले, त्यांनी तासगाव येथील क्रांतीकारकाच्या स्मृती सामाजिक काम करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राष्ट्रसेवा दल यांच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.त्याचबरोबर स्मारक स्तंभाची दुरावस्था दुर करुन या ठिकाणच्या स्वच्छता आणि टापटीप याविषयी काहीतरी करता येईल का याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.यावेळी शरद शेळके,प्रा वासुदेव गुरव,राष्ट्रसेवा दल तासगावच्या अध्यक्षा नुतन परिट,श्रेयस नाईक, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तासगाव शाखेचे कार्य अध्यक्ष अमर खोत, ग्रामविस्तार अधिकारी दत्तात्रय बामणे व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी तासगाव मधील कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्य सैनिकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कार्यक्रम केल्या बद्दल लोकांनी समाधान व्यक्त केले,असे कार्यक्रम आयोजित केले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.