प्रतिष्ठा न्यूज

धनगर समाजाला आरक्षण देऊन अन्याय दूर करा..सुधीरदादा गाडगीळ यांची मागणी; मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि.२३: धनगर समाजाला अनुसूचित जमाती(ST) चे आरक्षण तातडीने द्यावे आणि गेली ६८वर्षे या समाजावर होत असलेला अन्याय दूर करावा अशी मागणी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सविस्तर निवेदन दिले आहे. सांगली विधानसभा मतदारसंघातील धनगर समाज बांधवांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले. तसेच धनगर बांधवांच्या गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या आरक्षणाच्या लढाईला यश येवो अशीही सदिच्छा व्यक्त केली.
सांगली विधानसभा मतदारसंघातील धनगर बांधवांनी ढोल,ताशासह भेटून आमदार गाडगीळ यांना निवेदन दिले. अनुसूचित जमातीचे आरक्षण समाजाला मिळावे अशी मागणी केली. त्यावेळी आमदार गाडगीळ यांनी धनगर समाज बांधवांचे स्वागत केले. निवेदन स्वीकारले आणि धनगर आरक्षणाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाचीही माहिती दिली.
आमदार गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धनगर समाज पिढ्यानपिढ्या मेंढीपालनाचा व्यवसाय करीत आहे. ते पशुपालक आहेत. अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे ही त्यांची न्याय मागणी केली ६८ वर्षे प्रलंबित राहिली आहे. शासनाने तात्काळ निर्णय घेऊन समाजाला आरक्षण द्यावे आणि या समाजावरील अन्याय दूर करावा.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.