प्रतिष्ठा न्यूज

धनगर आरक्षण मागणीला माझा पूर्ण पाठिंबा…माजी खास.संजयकाका पाटील… धनगर बांधवांचें नागज येथे रस्ता रोको आंदोलन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : महाराष्ट्र राज्यामध्ये १५% इतकी लोकसंख्या असणाऱ्या धनगर समाजाने राज्य शासनाकडे गेल्या तीन ते चार दशकांपासून एस.टी. प्रवर्गातून आरक्षण मिळावे अशी आग्रही मागणी केलेली आहे.धनगर समाज हा महाराष्ट्रभर विखुरलेला असून हा समाज आजही भटका समुह म्हणून राहिला आहे.शेळ्या मेंढ्या पालन हा या समाजाचा मुख्य व्यवसाय असून हा समाज आर्थिक व सामाजिक अजुनही मागास आहे.धनगर समाजाने मागणी केलेनुसार एस.टी.प्रवर्गात आरक्षण मिळणेकरिता केंद्र शासनाने जे निकष ठरवलेले आहेत ते सर्व निकष धनगर समाज पुर्ण करीत असून त्यांनी सदर प्रवर्गातून आरक्षण मिळणेकरिता आज कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज येथे शांततेच्या मार्गाने रस्ता रोको केला.यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.राज्य शासनाकडील व केंद्र शासनाकडील धनगर समाजाच्या एस.टी.प्रवर्गात आरक्षणाबाबतच्या मागणीला माजी खासदार संजय काका पाटील यांनी पाठिंब्याचे पत्र देऊन या आरक्षण प्रश्नी लोकप्रतिनिधी म्हणुन नेहमीच धनगर समाजाच्या मागण्यांचा शासनाकडे पाठपुरावा करीन अशी ग्वाही दिली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.