प्रतिष्ठा न्यूज

सकल मराठा समाज तासगाव तालुक्याच्या वतीने जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा… सर्वपक्षीय नेत्यांचा निषेध…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : सकल मराठा समाज तासगांव तालुक्याच्या वतीने आज मनोज जरांगे-पाटील यांनी सुरु केलेल्या मराठा समाजाच्या ५० टक्के ओबीसी मधून आरक्षणासाठीचे सुरु असलेल्या उपोषणास जाहीर पाठिंबा देण्यात आला याबाबतचें निवेदन तहसीलदार यांना समाजाच्या वतीने देण्यात आले.त्यात म्हंटले आहे की,मनोज जरांगे-पाटील यांची खालावत चाललेली तब्येत परिस्थिती पाहता व त्यांचे आरोग्याचा विचार करता जीवितास धोका निर्माण होवू शकतो,अखंड मराठा समाजाची परीक्षा न पाहता तुम्ही स्वतः पुढाकार घेवून शासन स्तरावर मराठा समाजाच्या मागणीबाबतचे गांर्भीय कळवावे.तसेच सगेसोयरे अधिसुचनेची अंमलबजावणी करावी, हैद्राबाद गॅझेट,सातारा गॅझेट,बॉम्बे गॅझेट लागू करावे,शिंदे समितीला मुदतवाढ देणेत यावी,कुणबी नोंदी शोधण्याचे काम युध्द पातळीवर व्हावे ज्या कुणबी नोंदी मिळाल्या आहेत.त्यांचे प्रमाणपत्र वाटप करणेत यावे.यावेळी स्थानिक आमदार,खासदार व सर्व लोकप्रतिनिधी संविधानाची शपथ घेवून देखील मराठा समाजाची कायदेशीर व संविधानीक मागणी व विषय यावरती कोणतेही भाष्य करताना दिसत नाहीत अथवा त्यावरती विधानसभा व लोकसभा येथे मराठा आरक्षणाची संविधानीक मागणी करीत नाहीत,स्थानिक आमदार,खासदार व सर्व लोकप्रतिनिधी या सर्वांचा देखील सकल मराठा समाज तासगांव तालुका यांचेकडून जाहीर निषेध करण्यात आला.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.