प्रतिष्ठा न्यूज

पालकमंत्री डॉ. खाडेंच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन सर्व आजी-माजी नगरसेवकांनी केली मोठी घोषणा

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
मिरज : पालकमंत्री ना. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी मिरजेच्या विकासासाठी आजअखेर मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. त्यांच्या नेतृत्वास पुढे ही संधी मिळणे गरजेचे आहे. मिरजकरांच्या आकांक्षा पूर्ण करीत मिरज विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक गावात विकासकामांची गंगा ओसंडून वाहते आहे. यामुळेच आम्ही सर्व नगरसेवक एकत्र येऊन एकदिलाने सुरेशभाऊंना पाठिंबा देत आहोत, अशी ग्वाही मिरजेत आयोजित पत्रकार परिषदेत सर्व आजी-माजी नगरसेवकांनी दिली.
याप्रसंगी माजी महापौर इद्रिस नायकवडी, माजी सभापती सुरेशबापू आवटी, माजी महापौर संगीता खोत, माजी विरोधी पक्ष नेते संजयबापू मेंढे, माजी महापौर स्व. विवेक कांबळे यांचे सुपुत्र श्वेत कांबळे, करण जामदार, शिवाजी दुर्वे, आनंदा देवमाने, योगेंद्र थोरात, अतहर नायकवडी, गजेंद्र कुल्लोळी, निरंजन आवटी, गायत्री कुल्लोळी, गणेश माळी, प्रियांका पारधी, पांडुरंग कोरे, अस्मिता सलगर, शांता जाधव, संदीप आवटी यांचेसह अनेक आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते. मैनुद्दीन बागवान व संगीता हारगे हे अनुपस्थित असले तरी त्यांनी दूरध्वनीवरून सुरेशभाऊंशी संपर्क साधत जाहीर पाठिंबा दिला आहे.

याप्रसंगी माजी सभापती सुरेश आवटी म्हणाले, लोकसभेला विषय वेगळा होता, कारण विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार होते. जनतेत संभ्रम होता की लोकसभेला जे काही झाले तेच पुन्हा विधानसभेला होणार का ? मात्र तसे काही नसुन सुरेश भाऊंच्या नेतृत्वालाच आम्ही सर्व आजी-माजी नगरसेवक त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत. आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही त्यांना एकदिलाने मदत करणार आहोत. यामुळे त्यांचा मिरज विधानसभेतून त्यांचा विजय नक्की असेल असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.