प्रतिष्ठा न्यूज

लिंगायत समाजाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन,मंत्री अतुल सावे..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : जगतज्योती महात्मा बसवेश्वर महामंडळाच्या योजनांचा लाभ लिंगायत समाजातील सर्व जाती व पोट जातींना मिळणे संदर्भातील प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचे मत इतर मागास बहुजन कल्याणमंत्री ना.अतुल सावे यांनी व्यक्त केले.लिंगायत समाजाच्या वतीने मंत्री सावे यांना याबाबत निवेदन देण्यात आले.त्यात त्यांनी म्हंटल आहे की,महाराष्ट्र शासनाने ९/८/२०२३ रोजीच्या आदेशानुसार लिंगायत समाजाच्या उन्नतीसाठी जगतज्योती महात्मा बसवेश्वर महामंडळाची स्थापना केली.या महामंडळाच्या योजनांचा लाभ फक्त इतर मागास प्रवर्गातील समाविष्ट असलेल्या लिंगायत समाजाच्या काही पोटजातींना दिला जात आहे.महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात वीरशैव समाजातील अनेक नागरिक यांच्या जातीचा उल्लेख हिंदू लिंगायत,लिंगायत,वीरशैव लिंगायत असा असून या सर्व नागरिकांचा समावेश खुल्या प्रवर्गात होत आहे त्यामुळे हे नागरिक राज्यातील इतर कोणत्याही महामंडळाच्या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत त्यामुळे महामंडळ स्थापनेचे संपूर्ण उद्दिष्ट साध्य होत नाही अशा आशयाचे निवेदन तासगाव तालुक्यातील लिंगायत समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केले असून यासंदर्भात शासनाकडून धोरणात्मक निर्णय व्हावा त्याकरिता लवकरच एक शिष्टमंडळ संबंधित मंत्री यांना भेटणार आहे.त्यासंदर्भात मंत्री ना.अतुल सावे यांची भेट घेतली असता त्यांनी याबाबत सकारात्मक विचार चालू असल्याचे सांगितले.यावेळी महेश हिंगमिरे,निमणीच्या सरपंच सौ रेखा रविंद्र पाटील,अविनाश शेटे,कुमार शेटे, विनय शेटे,महादेव निवृत्ती चिवटे,  विवेक शेटे,अमित मिठारे,निमणीचे उपसरपंच राजेंद्र घोडके,सौरभ हिंगमिरे,नेहरूनगरचे माजी उपसरपंच राजगोंडा पाटील,निमणीचे माजी उपसरपंच आर डी पाटील,अमोल शेटे,पोपट आकाराम पाटील,प्रकाश बाबासो पाटील,गजानन दत्तू पाटील, उदय विजय पाटील,नवनाथ आप्पासो पाटील,मनोज कुमार बाळासाहेब पाटील यांच्या सह समाजातील प्रमुख मान्यवरांनी हे निवेदन दिले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.