प्रतिष्ठा न्यूज

ना वशिला,ना ओळख,थेट मिळते मदत… मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा जनतेने लाभ घ्यावा राज्यप्रमुख रामहरी राऊत यांचे तासगावात आवाहन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री वैद्यकिय सहायता कक्ष प्रमुख विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांच्या संकल्पनेतून केवळ २ वर्षात 40,000 पेक्षा अधिक गंभीर रुग्णांचे प्राण वाचले असून,राज्यातील प्रत्येक घटकांसाठी सहज लाभदायी असणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य प्रमुख  रामहरी राऊत यांनी केले.मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे कार्यपद्धती लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आरोग्यवारी तथा आरोग्य संवाद यात्रेचे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने आयोजन करण्यात आल्याचे राज्य प्रमुख रामहरी राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी ते म्हणाले मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाने विक्रम रचला असून रुग्णांच्या मदतीसाठी ३४० कोटींहून अधिक अर्थसहाय्य वितरीत करण्यात आले असून,ना वशिला,ना ओळख,थेट मिळते मदत,गोरगरीब – गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष आशेचा किरण ठरला आहे.
तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मध्ये रुग्णालय अंगीकृत ( empanel ) करण्याची आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मधून रुग्णांनी अर्थसहाय्य मिळविण्याची प्रक्रिया संपूर्णतः निःशुल्क असल्याचे सांगितले.सांगली जिल्ह्यात आत्तापर्यंत 1644 रुग्णांना 13 कोटी 20 लाख रुपयांची मदत झाल्याचे यावेळी राऊत यांनी सांगितले.मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत मिळवण्यासाठी मुंबईत मंत्रालयात जाण्याची गरज नसून घरबसल्या ऑनलाइन अर्जावर रुग्णांना मिळत असून रुग्णांनी किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी स्वतः थेट अर्ज करून मदत मिळवा,यासाठी 8650567567 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करुन थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळवा,आणि स्वतः अर्ज करा असे आवाहन राऊत यांनी केले.मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरायम आरोग्याचा प्रकाश आणला आहे.या योजनेमुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळत असल्याने ही योजना आता महाराष्ट्र राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना ठरत असल्याचे प्रतिपादन राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.गोरगरीब – गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे.या योजनेमुळे रुग्णांचे प्राण वाचत असल्याने मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण हा मदतीविना वंचित राहता कामा नये याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी दिले आहे.श्री एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारताच महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद पडलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष तात्काळ सुरू केला.मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची मूळ संकल्पना मांडणाऱ्या मंगेश नरसिंह चिवटे यांची विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करून मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी या कक्षाची जबाबदारी दिली आहे.संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मध्ये अनेक-विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी दिली आहे.यामध्ये अँजिओप्लास्टी,बायपास सर्जरी,कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी,डायलिसिस,जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर  इनप्लांट शस्त्रक्रिया,सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया,रस्ते अपघात,विद्युत अपघात,भाजलेले रुग्ण,जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे.दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यप्रमुख रामहरी राऊत यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना केले.यावेळी अमोल पाटील पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख,राज्य विस्तारक गौरव गुळवणी,तासगाव कवठे महांकाळ विधानसभा प्रमुख सचिन शेटे,नरेश पाटील सांगली उपजिल्हा प्रमुख,शिवसेना प्रमुख संजय दाजी चव्हाण,आणि मोठया संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट :
*अवघ्या एक वर्षाची दुवा बनली मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची ब्रॅण्ड अँबेसडर*
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या ब्रॅण्ड ॲम्बेसडर पदी अवघ्या एक वर्षाच्या दुवा नावाच्या चिमुकलीची निवड करण्यात आलेली आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील फहरीण मकुबाई आणि सादिक मकूबाई या मुस्लिम दांपत्याच्या पोटी जन्माला आलेल्या अवघ्या १३ दिवसांच्या बाळाचे प्राण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या लाखमोलाच्या मदतीमुळे वाचले होते. दरम्यान सहा महिन्यानंतर कोल्हापूर येथे झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात सदर मुस्लिम दांपत्याने संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हातात बाळाला सुपूर्द करत मुख्यमंत्री महोदय यांच्या दुवामुळे बाळाचे प्राण वाचले असल्याने या चिमुकलीचे नाव दुवा ठेवणार असल्याची इच्छा प्रकट केली.तब्बल एक लाख लोकांच्या साक्षीने मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी या बाळाला हातात घेऊन सदरच चिमुकलीचे नाव दुवा ठेवत असल्याचे जाहीर केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.