प्रतिष्ठा न्यूज

भुईबावडा घाटात कोसळली दरड : वाहतूक ठप्प; घाट माथ्यावर ढगफुटी

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : अतिवृष्टीमुळे भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.  करुळ व भुईबावडा घाट माथा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. मुसळधार पावसाने सर्वांची दाणादाण उडवून दिली. तर करूळ व भुईबावडा येथील शेतकऱ्यांच्या  नदीकाठची शेती जमिनदोस्त झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी भुईबावडा घाटात दाखल झाले आहेत.
सोमवारी सायंकाळी सह्याद्री पट्ट्यातील करुळ, भुईबावडा व इतर गावात मुसळधार पाऊस झाला. पावसाने अक्षरशः हाहाकार उडवून दिला. पहिल्यांदाच गावातून वाहणाऱ्या नद्याना महापूर आला आहे. तर अनेक काॅजवे पाण्याखाली गेल्याने वाड्यांचा संपर्क तुटला आहे. ठिकठिकाणी घाट मार्गात मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. भुईबावडा घाटात नाल्यांचे स्वरूप आले आहे. घाट रस्त्यात ठिकठिकाणी चिखल माती आली आहे. तर दोन ठिकाणी दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतूक बंद झाली आहे. करुळ घाट गेले आठ महिने वाहतुकीला बंद आहे. या घाटात देखील मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदी व वहाळांच्या  काठावर असलेले भात शेती ही जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.