प्रतिष्ठा न्यूज

गगनबावड्यात परतीच्या पावसाची चाल थबकली

प्रतिष्ठा न्युज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : लखमापूर येथील कुंभी मध्यम प्रकल्प चौथ्यांदा ‘ओव्हर फ्लो’ होण्याच्या मार्गावर. आज अखेर धरण परिसरात५६०१मि. मी. पाऊस कोसळला आहे.मान्सूनने परतीची वाटचाल सुरु केल्यानंतर गेल्या ८ दिवसांपासून संपूर्ण तालुक्यात व घटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोकणासह महाराष्ट्राला पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. सगळीकडे ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार माजवला.
मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून धरणे काठोकाठ भरली आहेत . सगळीकडे शेतीपिकांचं देखील प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे परतीच्या पावसाचा कहर नेमका कधी थांबणार? असा प्रश्न बळीराजाला पडला आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.