प्रतिष्ठा न्यूज

निमणीचें आर.डी.पाटील कृषी पणन मंत्र्यांना भेटले; सांगितली तासगाव बाजार समितीची व्यथा

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:निमणीच्या आर डी पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती तासगावच्या संचालक मंडळाच्या कारभाराबाबत महाराष्ट्र राज्याचे कृषी व पणन मंत्री नामदार अब्दुल सत्तार यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे.यावेळी कृषी उत्पन्न समितीचे विस्तारित बेदाणा मार्केटचे रखडलेले बांधकाम,या कामात झालेली अनियमयता,तत्कालीन संचालक मंडळाची चौकशीचे कामकाज,चौकशी अधिकारी यांनी सादर केलेला अहवाल,शासकीय मूल्यांकनाकाराने दिलेला अहवाल त्या अनुषंगाने कारवाई करण्यात होणारी दिरंगाई,बेदाणा उत्पादकांच्या समस्या,विक्री झालेल्या बेदाण्याच्या रक्कमा उत्पादक शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे ठरलेल्या वेळेत शेतकऱ्यांना मिळाव्यात,द्राक्ष उत्पादकांची व्यापारी व दलालांकडून होणाऱ्या फसवणुकी बाबत शासनाने ठोस उपाय योजना करावी अशा अनेक बाबींवर यावेळी पाटील यांनी चर्चा केल्याचे सांगितले.यावेळी मंत्री सत्तार यांनी बाजार समितीच्या कारभारात जातीने लक्ष घालनार असल्याचे सांगितले असल्याचे पाटील यांनी सांगितले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.