प्रतिष्ठा न्यूज

हरियाणा राज्यामधील सलग तिसऱ्यांदा झालेल्या विजयाबद्दल सांगली शहर भाजपाच्या वतीने कार्यकर्त्यांचा विजयी जल्लोष

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाला दणदणीत विजय मिळाला. सुरुवातीला पिछाडीवर असणाऱ्या भाजपाने नंतर थेट बहुमताचा आकडा गाठला. आज हरियाणा राज्यामध्ये सलग तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचा विजय झाल्याबद्दल माझ्या जनसंपर्क कार्यालयाच्या समोर भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. हा विजय भारतीय जनता पार्टी आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा द्योतक आहे, ज्यामुळे आम्ही आणखी मजबूत बनत आहोत. यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले की येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये सुद्धा महायुती सरकार पुन्हा एकदा पूर्ण बहुमताने सत्तेत येऊन महाराष्ट्रातील तळागाळाच्या सर्व लोकांचे काम करण्यासाठी कटिबद्ध राहील…
यावेळी पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश सचिव अश्रफ वांकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख केदार खाडीलकर, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा गीतांजली ढोपे पाटील, उर्मिला बेलवलकर, माधुरी वसगडेकर, अश्विनी तराळेकर, योगेश कापसे, अविनाश मोहिते, उदय मुळे, गणपतराव साळुंखे, दरीबा बंडगर, धनेश कातगडे, पृथ्वीराज पाटील, माजी नगरसेवक विनायक सिंहासने, सुबराव तात्या मद्रासी, गौस पठाण, प्रथमेश वैद्य, शांतिनाथ कर्वे, तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या ऐतिहासिक क्षणात एकत्र आलेल्या सर्वांनी विजयाच्या जल्लोषात सहभागी होत एकता आणि समर्पणाचा संदेश दिला. आपली एकजूट आणि मेहनत हाच आमचा यशाचा आधार आहे, आणि यापुढेही आम्ही या यशाच्या प्रवासात एकत्र राहणार आहोत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.