प्रतिष्ठा न्यूज

सांगली जिल्हा पोलीस दलाचे वतीने उपविभागीय स्तरावर सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यामध्ये पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा व्हावा याकरीता मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांच्या संकल्पनेतून सांगली जिल्हा पोलीस दलाचे वतीने उपविभागीय स्तरावर सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धा आयोजीत करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सदर स्पर्धेमध्ये सहभागी होणेबाबत गणेश मंडळांना अवाहन केले होते. गणेश उत्सव मंडळांना एक गाव एक गणपती-२० गुण व एक वार्ड एक गणपती ध्वनी प्रदुषण रहित (डॉल्बी/डिजे विरहीत) -३० गुण, अटी व शर्थीचे पालन-३० गुण, पर्यावरण पुरक मुर्ती-१० गुण, देखावा/शिस्त-१० गुण असे गुणांकनाचे मुद्दे देण्यात आलेले होते. सदर स्पर्धेत विजेत्यांची निवड करण्यासाठी जिल्हयातील सर्व ६-पोलीस उपविभागात उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली होती, सदर समितीमध्ये महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, महसुल विभागातील स्थानिक स्वराज्य संस्था मधील अधिकारी, सर्व पोलीस ठाणेचे प्रभारी पोलीस अधिकारी यांचा समावेश होता.

सदर स्पर्धेत खालीलप्रमाणे गणेश मंडळांचे पदाधिकारी/कार्यकर्ते यांचा आज दि.०८.१०.२०२४ रोजी ११.०० ते ११.५० या वेळेत सर्व विभागातील प्रत्येकी ३ प्रथम क्रमांक, व्दीतीय, तृतीय क्रमांक अशा जिल्हयीतल एकूण १८ गणेशोत्सव मंडळांना मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली व श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली यांचेकडून पारितोषिक व सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला.

सदर पारितोषिक वितरण सोहळ्याकरीता उपविभागीय अधिकारी, शहर विभाग श्रीमती विमला एम, उपविभागीय अधिकारी मिरज श्री. प्रणिल गिल्डा, उपविभागीय अधिकारी, इस्लामपूर श्री. मंगेश चव्हाण, उपविभागीय अधिकारी, विटा श्री. विपुल पाटील, उपविभागीय अधिकारी, जत श्री. सुनिल साळुंखे, उपविभागीय अधिकारी तासगांव श्री. सचिन थोरबोले यांचेसह जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी, सर्व शाखांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.