प्रतिष्ठा न्यूज

भाजपच्या छत्रपती शिवाजी महाराज” जाहीरनामा उपसमिती बैठक संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ “छत्रपती शिवाजी महाराज” जाहीरनामा उपसमिती महाराष्ट्रची बैठक भारतीय जनता पार्टी प्रदेशकार्यालय मुंबई येथे ११ ऑक्टोंबर रोजी संपन्न झाली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपा जेष्ठ नेते माजी खासदार विनयजी सहस्रबुद्धे व भाजपा ज्येष्ठ नेते आमदार संजय केळकर हे होते. या बैठकीमध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या, गड किल्ल्यांची दुरावस्था, शूर-वीरांच्या समाधीची दुरावस्था व गड किल्ल्यावरील वास्तूंची झालेली पडझड या विविध विषयावर बैठकीमध्ये जाहीरनामा उप समितीचे सदस्य हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशअध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी मुद्दे मांडून सहभाग घेतला व जाहीरनाम्यात घेण्यासंदर्भात सूचना व मुद्दे याचे लेखी स्वरूपात निवेदन माजी खासदार विनयजी सहस्रबुद्धे यांच्याकडे दिले.
यावेळी समितीचे सदस्य राहुल भोसले, राजेश दुगे, रवींद्र सासनकर, भरत आदमापुरे यांनी सूचना व मुद्दे मांडले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.