प्रतिष्ठा न्यूज

महाराष्ट्राची शिवकाशी कवठे एकंदचा दसरा पालखी सोहळा मोठया उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : महाराष्ट्राची शिवकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कवठे एकंदच्या श्री सिध्दराजाचा पालखी सोहळा शनिवारी रात्री मोठया उत्साहात पार पडला.सालाबाद प्रमाणे श्रींच्या पालखी समोर रात्रभर शोभेच्या दारुची आतषबाजी करण्यात आली.शनिवारी रात्री 8.45 वाजता सुरु झालेला पालखी सोहळा आज रविवारी सकाळी ९ पर्यंत सुरु होता.श्री सिध्दराज महाराजांच्या पालखी सोबत बिरोबा मंदिराची पालखी ही सोबत असते.यावेळी केल्या जाणाऱ्या नेत्रदीपक आतषबाजीने कवठे एकंदचे आसमंत उजळून निघाले होते.गावातील दोनशेहुन अधिक मंडळानी पालखी समोर नयन रम्य आतषबाजी करत उपस्थिताच्या डोळ्याचे पारणे फेडले.तासगांव तालुक्यातील कवठे एकंद येथे दसऱ्याला होणारी शोभेच्या दारूची आतषबाजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे.गावात श्री सिध्दराज महाराजांच्या पालखी समोर संपूर्ण रात्रभर रंगीबेरंगी शोभेची दारू उडवली जाते.गावातील प्रमुख मार्गावरून व सर्वांच्या घरासमोर ही आतषबाजी होते.गावात शोभेचे दारुकाम प्रत्येकाच्या घरी चालते.हा उत्सव पाहण्यासाठी महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात.यावेळी शोभेचे दारूकाम करताना स्फोटासारख्या घटना न होता दसऱ्यासाठी सुरक्षित दारुकाम कसे करण्यात येईल याची काळजी प्रशासनाने घेतली होती.यासाठी तहसीलदार अतुल पाटोळे,उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले,पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ,यात्रा कमिटी यानी विशेष ग्रामसभा घेत गावकऱ्यांशी चर्चा केली होती.प्रशासनाने ग्रामस्थांकडून सूचना मागवत उत्सव सुरक्षित कसा पार पडेल याची माहिती घेतली आणि ग्रामस्थांना सुरक्षित उत्सव कसा करावा याचा वस्तूपाठ घालून दिला आणि यातून खऱ्या अर्थाने लोकसहभागातून सुरक्षित उत्सव साजरा करण्याचे पाउल उचलन्यात आले.शनिवारी रात्री 8.45 वाजता पालखी सोहळा सुरु झाला,मंदिरापासुन पालखी सुरु होऊन बसस्थानक चौकात आली,तेथे पारंपारिक पध्दतीने पूजा होवून सोने लुटण्याचा कार्यक्रम झाला.आरती होऊन खऱ्या अर्थाने पालखी सोहळा सूरू होतो.यावेळी अग्नीपुत्र अजिंक्यतारा मंडळाचे कागदी शिंगटांचा दरारा ही खास आतषबाजी,आकाशतारा दारू शोभा मंडळाकडून थ्री स्टार झाड,रतनजी टाटा यांना आतषबाजीतून अभिवादन,नयनदीप तोडकर बंधूकडून”महाराष्ट्र पोलीस करणार महिलावर अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तीचा खात्मा ”अशी सामाजिक प्रतिकृती आतषबाजीतून दाखवण्यात आली.जमादार दारू शोभा मंडळाकडून पदक विजेती मनु भाकर हिचे अभिनंदन, नक्षलवाद्यांचा भारतीय कमांडो कडून खात्मा,सप्तरंग कुंभार गल्ली झापूक झुपुक चक्र,वेस, औट आतषबाजी,सिध्दीविनायकचा  उगवता सुर्य,कोरे अड्ड्याची लाकडी शिंगटे,श्रीराम फायर वर्क्स यांनी  अयोध्या येथिल राम मंदिरचां उद्घाटन सोहळा,तसेच ए वन व ईगल फायर वर्क्स यांनी शिवलिंग दर्शन व वर्ल्ड कप मध्ये सूर्यकुमार यादव ने घेतलेला अफलातून झेल,12 इंची झुंबर औट आतिष बाजीतून साकारण्यात आली.हिंदमाता दारु शोभा मंडळाने ”फायर शो औंटांची बरसात,श्री सिद्धराज दारू शोभा मंडळ ब्राह्मण गल्ली यांचेकडून शिव शंभो लाकडी शिगटे, झाडकाम,कवठेएकंद येथीलच त्रिमुर्ती,नवतरूण,अहिंसा,हिंदू मुस्लिम, लकी,आकाशदिप,नवहिंद, सिध्दराज,उत्कर्ष,महावीर,अरिहंत, हिंद- माता,आकाशतारा,राम रहीम, RDX,तिरंगा,यासह विविध मंडळांचे वतीने रंगी-बेरंगी झाडे,लाकडी शिंगटे, विविध प्रकारचे कलर औट,तसेच सुदर्शनचक्र,मोरचक्र,फुगडी, दांडपटटा,नमनचक्र,पंचमुखी, सप्तमुखी चक्र,बुरूज व विविध रंगाचे धबधबे,कारंजे आदीची नेत्रदिपक आतषबाजी करण्यात आली.सर्वांच्याच डोळ्याचे पारणे फिटेल अशी नेत्रदिपक आणि अवाक् करणाऱ्या  आतषबाजीचा भाविकांनी अनुभव घेतला.यावेळी नागाव कवठे येथे नागनाथाच्या पालखीचा सोहळाही उत्साहाने पार पडला.याठिकाणी ही नेत्रदीपक आतषबाजी,शिंगाट,ईत्यादि प्रकारची पारंपरिक पद्धतीने व सुरक्षित आतषबाजी करण्यात आली.
यावेळी कवठे एकंद ग्रामपंचायत, पोलीस अधिकारी,मंडल अधिकारी व कर्मचारी,आरोग्य पथक,तासगांव  पालिकेचेचे अग्निशामक,ऍम्ब्युलन्स, महावितरणचे कर्मचारी,तसेच आपत्कालीन यंत्रणा सज्ज होती.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.