प्रतिष्ठा न्यूज

गगनबावडा तालुक्यातील गारीवडे परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गनबावडा : गनबावडा तालुक्यातील गारीवडे व जर्गी परिसरात गे गड बसले चार दिवस अनेक शेतकऱ्यांना बिबट्या सदृश्य प्राणी  दिसल्याची चर्चा होती.

मात्र काल रात्री जरगी धनगरवाडा  येथील पांडुरंग विठू बोडेकर यांच्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. तसेच बाबू भाऊ बरगे यांची शेळी मारल्याचे समजते. याबाबत वन खात्याला कळविल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गावकरी व शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले असल्याचे दिसत आहे.
ग्रामीण भागात रात्रीचे नव्हे तर दिवसाही शेतामध्ये जाणे  कठीण झाले असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे. पूर्वीच्या काळी काही भागात रात्री शेतामध्ये गेल्यानंतर बिबट्याचे दर्शन घडायचे पण चक्क आता दिवसाही बिबट्या दिसू लागला असल्याने सर्वत्र घबराटीचे वातावरण पसरले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.