प्रतिष्ठा न्यूज

महामेळाव्यात शिक्षण विभागाचे स्टॉल ठरले लक्षवेधी

प्रतिष्ठा न्यूज
नांदेड प्रतिनिधी : येथील पीपल्स कॉलेजच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या जनजागृती महामेळाव्यात शिक्षण विभाग कडून उभारण्यात आलेले स्टॉल लक्षवेधी ठरले.
राष्ट्रीया विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्ताने जिल्हा प्रशासन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाद्वारे नागरिकांचे सशक्तीकरण शासकीय सेवा व विविध योजनांच्या जागृतीसाठी पीपल्स कॉलेजमध्ये महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात नांदेड जिल्हा प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी आपापल्या स्टॉलची उभारणी केली होती. त्यात शिक्षण विभागाने देखील तीन स्टॉलची उभारणी केली होती. त्यात फिरते ग्रंथालय, विविध शालेय शिष्यवृत्ती, महाकरिअर पोर्टल आणि मेंदूची व्यायामशाळा या स्टॉलवरील शिक्षण विभागाकडून देण्यात आलेली माहिती सर्वाना खूपच आवडली. या स्टॉलला नांदेड जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष नागेश व्ही न्हावकर, नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सौ. वर्षा ठाकूर-घुगे, नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने, नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव श्रीमती दलजीत कौर, नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, नांदेड अभियोक्ता संघाचे अध्यक्ष एस. एम. पुंड, नांदेड जिल्हा सरकारी वकील रणजित देशमुख, नायब तहसीलदार मकरंद दिवाकर, नायब तहसीलदार मुगाजी काकडे, नायब तहसीलदार सौ. उर्मिला कुलकर्णी आदींनी भेट देऊन माहिती घेतली. मेंदूची व्यायामशाळाचे प्रमुख बालासाहेब कच्छवे आणि त्यांची टीम नासा येवतीकर, राजाराम राठोड, सुनील मुत्तेपवार आणि इरफान शेख यांनी तयार केलेली चांगल्या व वाईट सवयीची सापशिडी ह्या मेळाव्याचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते. या स्टॉलला नांदेड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही आर पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, उपशिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे,उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर, आदींसह अनेक मान्यवर, नागरिक, विद्यार्थी, अधिकारी,महिलांनी भेट देऊन उपक्रमाची माहिती जाणून घेतली. महामेळावा यशस्वीततेसाठी प्रलोभ कुलकर्णी, उदय हंबर्डे, रुस्तुम शेख, सुधीर शिंदे, विस्तार अधिकारी हणमंत पोकळे, अनिता दाने, राजेश कुलकर्णी आदींनी अथक परिश्रम घेतले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.