प्रतिष्ठा न्यूज

राज्यात रुग्णांसाठी टोल फ्री नंबरसह पहिला तक्रार निवारण कक्ष सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ऍक्ट नियम 2021 शासन अधिसूचनेनुसार राज्यात प्रथम रुग्णाकरिता व दवाखान्या संदर्भात तक्रार निवारण कक्ष व टोल फ्री नंबर कार्यान्वित केल्याबद्दल सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार व वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांचा आरोग्य हक्क समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अभिनंदन पत्र पुष्पगुच्छ देण्यात आले. तसेच अधिसूचनेतील तरतुदीनुसार रुग्णहक्काची सनद व 15 प्रकारचे उपचाराचे दर पत्रक लावणे संदर्भात व नागरिकांच्या माहितीकरीता तक्रार निवारण कक्षाचे टोल फ्री नंबर सह फलक लावणी संदर्भात सूचना करण्यात आल्या. यावेळी आरोग्य हक्क समितीने केलेल्या पाठपुराव्याला महापालिकेने जनहितार्थ प्रतिसाद दिल्याबद्दल आभार मानण्यात आले. यावेळी शासन निर्णयानुसार रुग्ण हिताकरिता अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन आयुक्त पवार यांनी दिले. यावेळी आरोग्य हक्क समितीचे अध्यक्ष शाहीन शेख, राजेश साळुंखे, रमजान खलिफा, उज्वला सचिन आरवाळे, मधुमती कीर्तीवर्धन शब्बीर कले गार, स्वाती जवळे, अनमोल पाटील, तुषार वळीव, इलियास शेख, बालम मुजावर, माधव घोरपडे आस्था बेघर महिला निवारा केंद्राचे सुरेखा शेख पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.