प्रतिष्ठा न्यूज

गुरांना विहिरीचे पाणी काडून पाजत असतांना शेतकऱ्याचा विहिरीत तोल गेल्याने बुडून मृत्यू

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील धनंज बु. शेतकरी शिवाजी किशनराव गवाले- वय 38 वर्षे हा शेतकरी उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे नदी नाल्यांचे पाणी आटल्याने शेतातील विहिरीतुन गुरांना पाणी शेंदुन पाजत असाताना तोल गेल्याने विहिरीत पडल्यामुळे पाण्यात बुडुन त्याचा मृत्यु झाला. तो सुद्धा अल्पभूधारक शेतकरी असून त्याच्या नावे दिड एकर जमीन आहे. कुटुंब संख्या जास्त असल्यामुळे तो शेतीला जोडधंदा म्हणुन ते गुरे पाळत होता. परंतु रोजच्या प्रमाणे तो दि.14 एप्रिल 2023 रोजी दुपारी गुरांना विहिरीवर नेऊन पाणी शेंदून पाजत असतांनाच तो तोल जावुन विहिरीत पडल्याने बुडुन मृत्यु झाला.
घटनेची माहिती यांना समजताच उस्माननगर ठाण्याचे ठाणेदार पि.डी.भारती, प्रभु केंद्रे यांनी पंचनामा करून प्रेत कापशी बु प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले असून मयत शिवाजी गावाले याच्या पश्चात वयोवृध्द आई, वडील, पत्नी, 3 लहान मुली, 1 मुलगा असून या अत्यंत गरीब असलेल्या या कुटुबांचा मोठा आधार निघुन गेल्यामुळे कुटुंबातील दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.एकाच दोघांचा आकस्मिक मृत्यु झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.