प्रतिष्ठा न्यूज

जालना घटनेच्या निषेधार्थ मारतळा येथे कडकडीत बंद- बंद शांततेत संपन्न

प्रतिष्ठा न्युज/ वसंत सिरसाट
उमरा :- लोहा तालुक्यातील मारतळा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने दि.6 सप्टेंबर 2023 रोज बुधवारी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे संवैधानिक पद्धतीने मराठा समाजास आरक्षण मिळावे, यासाठी उपोषण सुरू असताना त्यांच्यावर पोलिसांकडून केलेल्या अमानुष हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यासाठी येथील सर्व व्यापाऱ्यांनी आपली आस्थापने स्वयंस्फूर्तीने बंद ठेऊन यात सहभागी होउन शासनाचा निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.
प्रारंभी सकल मराठा समाजाच्या वतीने- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महामार्गाने सरकार विरोधी घोषणा देत. आरक्षण आमच्या हक्काचे नाही, कुणाच्या बाप्पाचे, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सकल मराठा सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आरक्षणास विरोध करणाऱ्या सरकारचा विरोध करत जालना येथील घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला . यावेळी मारतळा परिसरातील कापशी बु.,खु. उमरा, धनंज बु.खु. नांदगाव, चिंचोली, कामळज, कौडगाव, वाका, वाळकी बु.खु., जोमेगाव, गोळेगाव, हिंदोळा, करमाळा, डोलारा, पिंपळदरी, हातणी, या गावातील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्ते, नागरीक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होता. यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून अंतर्गत पोलीस ठाणे उस्माननगर येथील पोलीसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.