प्रतिष्ठा न्यूज

पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालयाच्यावतीने स्वातंत्र्याची ७५ वर्षे या विषयावर रॅली

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय, गगनबावडा येथे ‘आझादी का अमृत महोत्सव ‘ उपक्रमांतर्गत आज दि. १७ ऑगस्ट २०२२ रोजी महाविद्यालयाचा एन.एस.एस विभाग आणि ग्रामपंचायत गगनबावडा यांच्यावतीने स्वातंत्र्याची ७५ वर्षे या विषयावर रॅलीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतिश देसाई, प्रा. डॉ. विद्या देसाई यांचे प्रोत्साहन लाभले. या रॅलीचे आयोजन कार्यक्रमाधिकारी प्रा. आदिनाथ कांबळे आणि प्रा. डॉ. एस. एस. पानारी यांनी केले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. एन. व्ही. शहा, सरपंच सौ. मानसी कांबळे, उपसरपंच मुश्ताक वडगांवे, ग्रामसेवक दिलीप दळवी, गुरुनाथ कांबळे, प्रा. डी. के. पाटील, प्रा. एच. एस. फरास, प्रा. एस. एस. घाटगे, प्रा. आर. आर. सरनोबत तसेच, विदयार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.