प्रतिष्ठा न्यूज

देशाला सांस्कृतिक आत्महत्येकडे नेले जात आहे : सय्यद सआदतुल्ला हुसैनी

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड :-येथील जमात-ए-इस्लामी हिंद च्या वतीने शिवाजी नगर भागातील विसावा पॅलेस मध्ये “भारताची सद्यस्थिती आणि आपली भूमिका” या विषयावर चर्चा सत्र बैठकीचे आयोजन दि.23 सप्टेंबर 2023 रोजी करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष- शिवश्री कामाजी पवार हे होते तर प्रमुख म्हणून- जमात-ए-इस्लामी हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे उपाध्यक्ष- मा.सय्यद सआदतुल्ला हुसैनी, व माजी खासदार-मा.व्यंकटेश काब्दे हे उपस्थित होते.
यावेळी “भारताची सद्यस्थिती आणि आपली भूमिका” यावर उपस्थित सर्व धर्मीयांनी आपले विचार व्यक्त करून या चर्चा सत्रात भाग घेतला.
यावेळी उपस्थित असलेले अमीर जमात म्हणाले की, देशातील फॅसिस्ट शक्ती देशाचे वातावरण बिघडवण्यासाठी सर्व शक्ती वापरत आहेत. देशात दंगली आणि लिंचिंगच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. यावर चिंता करणे आणि सांप्रदायिक शक्तींशी लढणे व पर्यावरणाचे संवर्धन करून देशात शांतता निर्माण करण्याची जबाबदारी आपली आहे असे ते म्हणाले.
माजी खा- डॉ. व्यंकटेश काब्दे हे बोलतांना म्हणाले की सामाजिक संघटनांना सोबत घेऊन एकत्र काम करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
तर मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष- शिवश्री कामाजी पवार हे विचार मांडतांना म्हणाले सध्याच्या सरकारच्या अपयशाचा उल्लेख करून सामाजिक संस्थांना पुढे येऊन जनजागृती करण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात हुसैनी म्हणाले की भारताचे संविधान वाचले व जपले पाहिजे देशातील स्वायत्त संस्था स्वतंत्र काम न करता शासनाच्या दबावाखाली काम करतात दिसत आहेत त्यामुळे संविधानाचे महत्त्व कमी होत आहे. यामुळे देशाला सांस्कृतिक आत्महत्येकडे नेले जात आहे याचा विचार आपण करणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.
यावेळी जमातने आयोजित केलेल्या या चर्चा सत्राचे कौतुक करून एकत्र येण्याची घोषणा केली.
शेवटी आभार- अमीर अब्रार देशमुख यांनी मानले. या बैठकीत 25 संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.