प्रतिष्ठा न्यूज

दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन तर्फे अवयवदान जनजागृती

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : अवयवदान आणि शरीरदानाच्या उदात्त हेतूला चालना देण्यासाठी वृंदावन  व्हिलाज टाऊनशिप येथे दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोजी, दि फेडरेशन ऑफ ऑर्गन्स अँड बॉडी डोनेशन यांचे मार्फत, गणेशोत्सवाच्या उत्साही वातावरणात अवयवदान जनजागृती कार्यक्रम पार पडला.

वृंदावन व्हिलाज सोसायटीचे अध्यक्ष बाळासो पाटील, मनीषा नाईक आणि मनीषा वाघंबरे यांनी दि फेडरेशन ऑफ ऑर्गन बॉडी डोनेशनच्या सांगली जिल्हा कोऑर्डिनेटर डॉ.सौ.हेमा शितल चौधरी तसेच  सब- कोऑर्डिनेटर डॉ.सार्थक पाटील त्यांचे स्वागत करून सत्कार केला.

*डॉक्टर सौ हेमा चौधरी* यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान अवयवदानाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकून गेले. नेत्रदान, त्वचादान ,देहदान आणि अवयवदान या सर्व प्रकारांवर  प्रबोधनात्मक आणि शास्त्रीय माहिती देऊन त्यांनी उपस्थित श्रोत्यांना अवयव दानाचे महत्त्व पटवून दिले.
*डॉक्टर सार्थक पाटील* यांनी अवयव दानाच्या नैतिक बाजू स्पष्ट केल्या.

यावेळी ज्या दात्यांनी आपल्या नातेवाईकांचे नेत्रदान तसेच देहदान तसेच अवयवदान केले आहे अशा व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.

प्रभावी प्रबोधनामुळे उपस्थितांपैकी बऱ्याच जणांनी अवयव दानाचे फॉर्म भरले गेले.
फेडरेशनच्या *सौ पद्मजा माने* यांचा कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये मोठा वाटा होता.
सीमा मरजे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.
युवराज मगदूम आणि धीरज गोडसे यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच इच्छुकांचे अवयवदान फॉर्म भरून घेतले.
अवयवदानाच्या महत्त्वाविषयी जागरूकता पसरवून, अधिकाधिक व्यक्तींना दाते बनण्याचे आणि जीवनाचे दान देण्याचे धाडसी पाऊल उचलण्यास प्रेरित करण्याची आशा  करण्यात येते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.