बुद्धिबळ स्पर्धेत केंब्रीज स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : स्वर्गीय मदन भाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ केपीएस चेस अकॅडमी यांनी बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली होती . या बुद्धिबळ स्पर्धेत संयोगिता पाटील केंब्रिज स्कूल व केंब्रिज सी बी एस सी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून यश प्राप्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष संस्थापक पृथ्वीराज पाटील व विश्वस्त वीरेंद्रसिंह पाटील यांनी केले . रुद्रतेज शिंदे , आशिष मोटे ,ओम कनवाडे , अहमद मुश्रीफ , अर्णव भस्मे या यशस्वी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र व शील्ड देऊन गौरविण्यात आले. तसेच या स्पर्धेमध्ये केंब्रिज स्कूलला उत्कृष्ट शाळा म्हणून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.या खेळाडूंचा संस्थेच्या अधीक्षिका ख्रिस्टीना मॅडम, मुख्याध्यापक साहेबलाल शरीक मसलत, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका श्रीदेवी कुल्लोळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. क्रीडा शिक्षक दीपक शेलार, सोमनाथ बलगुडे, चंद्रशेखर मिरजे यांचे मार्गदर्शन लाभले.