प्रतिष्ठा न्यूज

शिक्षणानंतर आर्थिक क्षेत्रात कर्मवीर पतसंस्थेने अण्णांचे नांव मोठे केले : आमदार डॉ. विश्वजीत कदम; शाखा वसगडे चे प्रशस्त आधुनिक वास्तुत स्थलांतर कार्यक्रम प्रसंगी काढले गौरवोद्गार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : वसगडे कर्मवीर अण्णांनी शैक्षणिक कार्य रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उभे केले, रयत ने त्यांचे शैक्षणिक कार्य पुढे नेले. त्यानंतर महाराष्ट्रात कर्मवीर पतसंस्था सांगलीने आर्थिक क्षेत्रात अण्णांच्या नावाने पतसंस्था स्थापली व उत्तुंग कार्य करून अण्णांचे नांव आर्थिक क्षेत्रात पुढे नेण्याचे महनीय कार्य केले आहे. त्याला तोड नाही असे गौरवोद्गार आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी काढले, कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या, सांगली च्या वसगडे ता. पलुस येथील शाखेचे प्रशस्त वास्तुत स्थलांतर आमदार डॉ. विश्वजीत कदम यांचे हस्ते नुकतेच संपन्न झाले, या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमा पुजन संपन्न झाले.

कर्मवीर पतसंस्थेने जवळपास सात लाख लोकांचे जीवन उजळवण्याचे कार्य केले आहे. संस्थेची प्रगती पहाता संस्थेला महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षेत्र देखील अपुरे पडेल या प्रगतीच्या चढत्या आलेखामुळे कर्मवीर पतसंस्था राज्यात नव्हे तर देशात आदर्श म्हणुन पुढे येईल, असा आशावाद डॉ. विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला

स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन श्री रावसाहेब पाटील यांनी केले. संस्था करीत असलेल्या कार्यामध्ये अर्थकारण, प्रगती, तंत्रज्ञान, ग्राहकसेवा, समाजसेवा या कार्याचा आढावा त्यांनी घेतला, सांगली कोल्हापूर सातारा जिल्हा कार्यक्षेत्रात संस्थेच्या ६० शाखा कार्यरत असून संस्थेची सभासद संख्या ६३००० इतकी आहे. संस्थेचे सभासद ठेवीदार, कर्जदार, सेवक या सर्वांचे मिळून ७ लाख लोकांचे हे कुटूंब बनल्याचे त्यांनी नमुद केले. सभासदांच्या विश्वासावर संस्थेने रु.१०२० कोटीच्या ठेवी गोळा केल्या आहेत. तर रु ७९५ कोटीचे कर्ज वाटप केले आहे, कामकाज करीत असताना संस्थेने सभासद, कर्जदार, सेवक यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असून ते पतसंस्था क्षेत्रात वेगळेपण निर्माण करणारे आहेत. असे श्री. रावसाहेब पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात नमुद केले.

यावेळी श्री. रावसाहेब पाटील यांच्या हस्ते आ. डॉ. विश्वजीत कदम यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी वसगडे शाखेचे सल्लागार नसरगोंडा भाऊ पाटील, अरविंद अण्णा पाटील, अमोल राजगोंडा पाटील,  नेमगोंडा राजगोंडा पाटील,  सचिन आण्णासो पाटील, अजित वावगोंडा पाटील,  सुदर्शन सुरेश मद्वाण्णा,  नारायण जगन्नाथ कुलकर्णी यांच्या सह मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल मगदुम, विभागीय अधिकारी अशोक राजांचा, शाखाधिकारी अभिजीत कदम यांचा सत्कार आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बसगडे गावच्या वतीने आमदार यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमास वसगडेचे सरपंच सौ. वृशाली गजानन काशिद, उपसरपंच अनिल आदगोंडा पाटील, ब्रम्हनाळचे सरपंच सौ. गिता गायकवाड, उपसरपंच सुभाष वडेर, खटावचे सरपंच ओंकार गणपती पाटील, उपसरपंच श्रीकृष्ण शिवलींग पाटील, सुखवाडीचे सरपंच  बाळासो भगवान यादव, पंचायत समिती सदस्य प्रल्हाद गडदे हे प्रमुख उपस्थित होते. त्यांचा संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी सत्य विजय बँकेचे चेअरमन प्रकाश बापू पवार यांनी मनोगत व्यक्त करुन संस्थेला शुभेच्छा दिल्या व संस्थेचे कार्य अतिशय उत्तम असून त्यांच्याकडून शिकण्यासाठी आम्ही संस्थेला भेट देवून माहिती घेवू अशी भावना व्यक्त केली. या कार्यक्रमास वसगडे, नांद्रे, ब्रम्हनाळ, खटाव, सुखवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

या कार्यक्रमास संस्थेचे संचालक अँड एस. पी. मगदूम, डॉ. रमेश वसंतराव ढबू , ए. के. चौगुले (नाना), वसंतराव धुळाप्पाण्णा नवले, डॉ. एस. वी. पाटील (मोटके) संचालिका भारती आप्पासाहेब चोपडे, तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाड़े, लालासो भाऊसो थोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदूम यांच्यासह संस्थेचे सभासद, सेवक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. अशोक अण्णा सकळे यांनी मानले. सुत्रसंचलन संजय सासणे यांनी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.