प्रतिष्ठा न्यूज

बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तूंचा संच वाटप योजनेचा शुभारंभ करते वेळी मोदी किंवा भाजप पक्षाचा प्रचार प्रसार केल्यास कार्यक्रम उधळून लावू : वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांच्या इशारा

वंचित बहुजन माथाडी व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांचे मा. सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि १८ : वंचित बहुजन माथाडी व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांच्या शिष्टमंडळाने, सहाय्यक कामगार आयुक्त मा. मुजावर साहेब यांना, लेखी निवेदन द्वारे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांच्या इशारा देण्यात आला. यावेळी विविध मागणीचे निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये १) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या नोंदीत बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचे लाभ देण्यासाठी जिल्हा कामगार कार्यालयातील दुकाने निरीक्षक, लाभदेय अधिकारी,R0 या अतिरिक्त चार्ज देण्यात आले आहे. या महाराष्ट्रातील सर्व अधिकारी यांना अतिरिक्त कामासाठी प्रोत्साहन भत्ता देऊन अधिक काम करण्यासाठी उत्सव वाढवावा. २) नोंदीत बांधकाम कर्मचाऱ्यांचे लाभाचे अर्ज भरते वेळी येणाऱ्या अडचणींचा तात्काळ निपटाला व्हावा. ३) काही लोक बांधकाम कर्मचाऱ्यांना भांड्याचे साहित्य मिळवून देतो असे सांगून आर्थिक लुबाडणूक करीत आहेत त्याचा खुलासा व्हावा व संबंधितावर कडक कारवाई व्हावी. ४) मध्यान भोजनाचा निकृष्ट दर्जाच्या असल्यामुळे ठेका रद्द केला आहे. त्याऐवजी सदरचे पैसे बांधकाम कामगारांच्या खात्यावर वर्ग करावेत. ५) नोंदीत मयत बांधकाम कर्मचारी यांच्या वयामध्ये १८ ते ६० वयाचा समावेश व्हावा.मयत वारसा लाभ देत असताना विवाह प्रमाणपत्र व वारस प्रमाणपत्र अट रद्द करावी. ६) बांधकाम कर्मचाऱ्यांच्या मुलांना मिळणाऱ्या शैक्षणिक लाभात वाढ करून जास्तीत जास्त शैक्षणिक योजनेसाठी पैसे खर्च करावेत. ७) बांधकाम कामगारांच्या ऑफलाइन नोंदणी करत असताना झालेल्या त्रुटीचा लवकरात लवकर निपटारा करावा. ८) बांधकाम कामगारांच्या लाभाच्या जाहिरातीवरील राजकीय पक्षांचे वाढते वर्चस्व बंद करावे व कोणत्याही मंत्र्यांचे व पक्षाचे चिन्ह छापण्यास मनाई करावी. ९) कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे बांधकाम कामगारांचे अर्ज पेंडींग पडत आहेत. त्याकरता नोकर भरती करावी व बांधकाम कर्मचाऱ्यांच्या मुलांनाच शैक्षणिक योग्यतेनुसार कामावर घ्यावे. असे विविध मागण्यांचे निवेदन दिले
सर्व मागण्या ताबडतोब मान्य करून नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावेत. तसेच सत्ताधारी राजकीय फायद्यासाठी मंडळाचा वापर बंद करावा राजकीय हस्तक्षेप थांबवा. अन्यथा आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात आदरणीय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली मार्फत सांगली जिल्ह्यातील पालकमंत्री तथा कामगार मंत्री यांच्या दालना समोर सांगली जिल्हात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करावे लागेल यांची नोंद घ्यावी. आणि होणाऱ्या
नुकसानीला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई, तसेच महाराष्ट्र राज्य शासन जबाबदार राहणार आहे. असा कडक इशारा देण्यात आला.
यावेळी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, महासचिव अनिल मोरे सर, जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, सांगली शहर अध्यक्ष युवराज कांबळे, जगदिश कांबळे, नूरसाब गडेकर,सूनकाप्पा मद्रासी, रविंद्र मद्रासी, संगाप्पा शिंदे, मंजूनाथ कांबळे, बंदेनवाज राजरतन, विक्रांत गायकवाड,आशीष मोरे,संजिव कुंभार,अजीत इंगळे, काशिराम ननवरे, जावेद आलासे, इसाक सुतार,असलम मुल्ला, श्रीरंग चौगुले, सुभाष पाटील, संदिप कांबळे यादी प्रामुख्याने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.